लक्ष देऊन बघा मंडळी, विनोद केंव्हा केव्हा होतात,
कुणी कधी फजित पडलं, तर लोकं त्यावर हसतात,
कधी कुणी पडतं, कशात तरी अडखळून,
काहींना हसू मात्र येतं त्यावर खळखळून,
कमरेखालची भाषा कुणी वापरली असेल,
समोरच्याची हसून भांबेरी उडालेली दिसेल,
दुसऱ्याच कमीपणा दाखवून ही हसू कमावतात,
वर त्याचे कार्यक्रम करून सर्वांना दाखवतात,
वाट्टेल तसें हावभाव पण हसू आणतात ओढून,
नवरा बायकोचे संवाद, बोलून दाखवतात विनोद म्हणून,
सासू सुनेच नातं तर बदनाम आहे,
विनोदवीर त्याचं ही सादरीकरण करून दाखवतात आहे.
शब्दांच्या कोट्या करून काही विनोदनिर्मिती करतात,
खूप अवलोकन करूनही , त्यावर विनोद तयार करतात,
पण काही असो, माणूस हसतो हे काय कमी आहे,
स्वतः च्या दुःखातून बाहेर पडायला विनोद च कामी पडतो आहे!!