पण आणि परंतु, आयुष्यात बसलेले असतात,
अध्ये मध्ये ते आपल्याला भेट देतात,
कारण त्यांच्यामुळे जीवन अपूर्णच राहील,
पण नाही अन परंतु नाही, तर काय बरं मजा राहील,
तर असा आहे आपला "पण", सदैव अपूर्ण,
"परंतु"च्या मात्रे शिवायही होतं का काही पूर्ण?
असं "पण " झालं असतं तर काय मज्जा आली असती!
"परंतु"नशिबी असावं लागतं ना सर्व, ही भाषा कशी कानावर आली असती?