किती विश्वासाने पाठवते चिऊ, चिमण्यास बाहेर,
उडून आणावे दाणे त्याने, दिवसा अखेर,
आल्यावर खाऊ वाटून, दाणे आलेले,
चोचीतून भरवू एकमेकास प्रेमभरे,
असंच निघून जावं आयुष्य, अजून हवंय कायबरे?
पण नियती स हे मंजूर नव्हते कधीच,
चिमण्यास भेटली बाहेर चिमणी नवीच,
गुंतला जीव त्याचा तिच्यामध्ये अलगद,
घरट्यात चिमणी वाट बघत असे, कल्पना सुखद,
चिमणी होती आपल्याच दुनियेत मश्गुल,
आपलं घरट आणि बरं आपलं चूल अन मूल,
चिमणा गुंतत गेला नवीन चिमणित फार,
हळूहळू चिमणीच्या लक्षात आलं, डोक्यावर आला भार,
कुठं बोलावं दुःख आपलं, समजे ना तिला,
सैरभैर झाली ती, कसं समजवेल आपल्या मनाला,
हिय्या करून बोलली ती चिमण्याशी ह्यावर,
हसत त्याने टाळले, अन चक्क हात केलें वर,
म्हणाला तिज हा तुझ्या मनाचा आहे खेळ,
नवीन चिमणी अन माझा न कुठलाच मेळ,
चिऊताई बिचारी उगी बसली, विश्वासाने,
पुन्हा चिमणा मोकळा, अजून नव्या उमेदीने,
कळलं होतं चिमणी ला, आता हा राहीला न आपुला,
घरटं सोडलं तिनं चिमण्याच नवा मार्ग शोधला !!!
..अश्विनी थत्ते