नाती-गोती, खरंच येतात का निवडता?
जो जसा आहे तसा स्वीकारा ही अपरिहार्य ता.
कोणी असतात कुशाग्र, कुणी साधारण,
तरीही करावी लागते त्यात प्रेमाची गुंफण.
स्पर्धा नव्हे ही, ही तर आहे वाटचाल,
तरचं तयार होईल लयबद्धता, अन जमेल सूर-ताल.
मग बघा कसा फुलेल, नात्यांचा हा मळा,
येईल ऐकू कानी गुंजन, हसू येईल खळखळा !
व्हावं मोकळं, हवं तितकं आपल्या लोकांत,
मनावरचं ओझं, बघा नाहीस होईल क्षणात,
जरा रुसवा-फुगवा, असतोच की हो ह्यात,
पण खूपच ताणल, की लगेच तुटतात,
असो तरी आंबट-गोड लोणचं असतं प्रत्येक नातं,
जसं जसं मुरत, रुचकर होत जातं !
....अश्विनी थत्ते.