Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Morning Skin Care Tips : सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे

Morning Skin Care Tips : सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे
, बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (10:15 IST)
सकाळी सकाळी उठल्यावर आपण आपल्या चेहऱ्यावर सूज बघितली असेल. कधी कधी चेहऱ्यावर बारीक पुळ्या पण येतात. जास्त ताण, झोप पुरेशी न होणं किंवा एखाद्या वस्तूंची ऍलर्जी असल्यास बारीक पुळ्या किंवा पुरळ येतात. पण एक सोपी टिप्स अवलंबवून आपण त्वचेशी निगडित समस्यांपासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्यात. 
 
सकाळी- सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा. कोणतेही साबण, फेसवॉश न वापरता केवळ पाण्याने चेहरा धुवावा. तर आपल्या चेहऱ्यावर हळू-हळू तेज येऊ लागतो. असे आपण नियमित करावं. थोड्याच दिवसात आपणास फरक जाणवू लागेल. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.
 
* आपल्या सर्वांना हे ठाऊकच आहे की चेहऱ्यावर आईस क्यूब चोळणे फायदेशीर मानले जाते. त्याच प्रमाणे थंड पाण्याने चेहरा धुणं आपल्याला उत्साही करतं. असे केल्याने त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते. आपली त्वचा तरुण राहते. आपण थंड पाण्याने चेहरा धुवत असाल, तर चेहऱ्याचा बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
 
* चेहरा सकाळी थंड पाण्याने धुतल्याने त्वचा तजेल होते आणि ज्यामुळे रक्त प्रवाह तीव्र होतो आणि चेहऱ्यावर चकाकी येते.
 
* जर आपण स्टीम किंवा वाफ घेता, तर त्यानंतर आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने आवर्जून धुवावे. असे केल्याने रोमछिद्र बंद होतात. 
 
* जर आपल्या त्वचेला सन बर्नचा त्रास होत असल्यास, दररोज सकाळी-सकाळी आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवावे. शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा आवर्जून करावं. असे केल्यास आपल्याला सूर्य किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मुक्ती मिळेल आणि त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावर टवटवीत पणा येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरड्या खोकल्यामुळे होणारा धोका कसा टाळता येईल? जाणून घ्या