मी आणिक मी आम्ही दोघे एक घरामधले रहिवासी,
दोन गावचे दोन दिशांचे हा रत येथे, हा वनवासी..
हा व्यवहारी रंगुनी जातो, हिशोब करतो रुपये आणे,
नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गणे..
मित्र सख्यांचा मेळा जेथे तेथे त्याचे विसावते मन,
हा एकाकी, हृदय व्यथेला नाही त्याच्या कुठले सांत्वन..
नीती रिती चा विवेक ह्याला प्रवाह घाटा मधून वाहे,
स्वैर अनागर नागर जागी तो, कसले बंधन तया न साहे..
अली परी हा गर्दी मधूनी विहार करतो रसज्ञ मार्मिक,
शून्य पथि तो चिरंतनाच्या ओझे घेऊन चाले यात्रिक..
मी आणि मी आम्ही दोघे वस्ती साठी एक परी घर,
दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवांतील रखूनी अंतर..