Publish Date: Sun, 28 Jul 2024 (15:03 IST)
Updated Date: Sun, 28 Jul 2024 (15:06 IST)
काल अनुभवला एक पाऊस, भिजवून गेला,
तना पेक्षा मनांत आंत तो ओला वून गेला,
हिरव्यागार पानांत, हरवलं माझं मन,
खळबळ वाहणाऱ्या ओढ्यातून वाहून गेलं आपणहून,
धरित्री ही नटली होती, काय सौंदर्य वर्णाव,
बाहेर निघाल्या खेरीज, कसं बरं दिसावं?
एक आगळा गंध होता सर्वदूर पसरलेला,
मनसोक्त बरसला होता "तो",अन वेड लावून गेला.
थंडगार वारं, अंगाशी खेळत होत अवखळ,
ऐकू येत होती कानी, पानांची सळसळ,
एक रम्य आठवण घेऊन परतले घरी,
माझ्या मनात मात्र कोसळत होत्या पावसाच्या सरी!!