Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"जमेल तसे प्रत्येकाने ... कुणावर तरी प्रेम करावे ...

poem in marath
, गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (13:45 IST)
"जमेल तसे प्रत्येकाने ...
कुणावर तरी प्रेम करावे ...
कधी संमतीने ..
कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!
प्रेम सखीवर/पत्नीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!
आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!
प्रेम पुत्रावर / पुत्रीवर  करावे ..
जमल्यास,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!
प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!
शिवबाच्या बाण्यावर ...
लताच्या गाण्यावर
प्रेम ..
सचिन च्या खेळावर आणि
वारकऱ्यांच्या टाळावर हि करावे !
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!
महाराष्ट्राबरोबरच ..
देशावर ...
आणि अगदी ..
न चुकता स्वतःवर ...
जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

80 पार आजोबा अन् 70 पार आजी...