वाट उजेडाची दाऊनी तिनं,
स्त्रियांना दाखविले नवे दालन,
उपकार तुझं समस्त नारी जातीवर,
उपसले खूपच कष्ट,पण केला मार्ग सुकर,
शिवधनुष्य च होतं ते, पेलवण नव्हतं सहज,
पण जिद्द होती उराशी, केलं ते काबीज,
आज असाया हव्या होत्या तुम्ही प्रगती पहाया,
काय काय कर्तृत्व दाविती आता आया बाया,
मानाचा मुजरा हा झालाच पाहीजे,शिश झुकवुनी!
आहोत उपकारात तुमच्या,सर्वस्व मानूनी!
सावित्रीबाई फुले, हे नाव अजरामर,
खुल झालं आभाळ सारं, उडली फुलपाखरं !!
..अश्विनी थत्ते