Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जागतिक अनुवाद दिवस साजरा

जागतिक अनुवाद दिवस साजरा
, गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (15:02 IST)
दिनांक 30 सप्टेंबर, जागतिक अनुवाद दिवसाच्या अनुषंगाने शॉपिज़न मराठीद्वारे गूगल मीटवर एक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी हिंदी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, लघुकथाकार व प्रकाशक 'मधुदीप' यांच्या मराठीत भाषांतरित लघुकथा संग्रह "माझ्या निवडक लघुकथा (भाग १)" चे विमोचन करण्यात आले. 

webdunia

 
ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादक आणि लघुकथा लेखिका अंतरा करवडे यांनी हा अनुवाद करून ई-पुस्तक रूपात शॉपिज़न. इन वर प्रकाशित केला आहे. चर्चा प्रमुख रूपात शॉपिज़न. इन च्या मराठी विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे उपस्थित होत्या. त्यांनी शॉपिज़न. इन या साहित्यिक वेबसाईट बद्दल माहिती दिली. कार्यक्रमात सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि लघुकथा लेखिका अनघा जोगळेकर हजर होत्या. अनघा जी यांना नुकताच त्यांच्या कादंबरी "अश्वत्थामा- यातना का अमरत्व" साठी वागीश्वरी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनघा जी यांनी लघुकथा विधा आणि मधुदीप जी यांच्या व्यक्तिमत्व आणि कृतित्व यावर समग्र चर्चा केली.
 
कार्यक्रमात विश्व भाषा अकादमी मध्यप्रदेश उपाध्यक्ष आणि सुप्रसिद्ध लघुकथा लेखिका डॉ वसुधा गाडगीळ यांनी लघुकथा संग्रहाच्या भावानुवाद आणि भाषा सौंदर्यावर आपले विचार मांडले. त्यानंतर अंतरा जी यांनी संग्रहातील एक लघुकथेचे हिंदीत आणि मग त्याच लघुकथेच्या मराठी अनुवादाचे वाचन केले.

कार्यक्रमाची सत्कारमूर्ती मधुदीप जी यांनी आपल्या अनुभवी शब्दांनी आशिर्वचन दिले. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक दिव्या शर्मा, आकाश प्रकाशन प्रमुख पांडुरंग कोकुलवार आणि इतरही साहित्यिक दर्शक दीर्घेत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकरीसाठी अर्ज करा, 6 ऑक्टोबर शेवटली तारीख