Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घर सजावटीसाठी ओशन, ट्रेडिशन, बांबूनापसंती

घर सजावटीसाठी ओशन, ट्रेडिशन, बांबूनापसंती

वेबदुनिया

गृहसजावटीचे सध्या अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण आपले घर हे सुंदर व इतरांपेक्षा जरा वेगळे दिसावे यासाठी एखादी थीम घेऊन घर सजवण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. थीम म्हणजे एक विषय घेऊन त्याभोवती घराच्या सजावटीची सांगड घालायची. ओशन, ट्रेडिशन, बांबू असे अनेक प्रकारांना सध्या पसंती मिळत आहे.

webdunia
ओशन 
ओशन थीम समुद्री सजावटीशी निगडीत आहे. ज्याप्रमाणे समुद्रात शंख, शिंपले, मासे, झाडे इत्यादी निरनिराळ्या सागरी खजिन्यापासून सजले आहे त्याप्रमाणे त्या सर्व वस्तूंचा वापर घर सजावटीसाठी केला जातो. समुद्राच्या निळ्या रंगाचा, त्यातल्या छटांचा भिंत रंगवण्यासाठी वापर केला जातो. दर्शनी भिंतीवर वाळू किंवा समुद्री लाटांचे टेक्श्चर दिले जाते. त्यासाठी शिंपल्यांचाही उपयोग केला जातो. शिंपल्यांच्या टेक्शचरचा वापर घरातले खांब, छतांचा किंवा दरवाजा-खिडक्यांची चौकट सजवण्यासाठी केला जातो.


 
webdunia
बांबू 
गृहसजावटीसाठी बांबूचा व त्यापासून बनवलेल्या वस्तूंचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. बांबूच्या डिझाइश्रचे कारपेट व बांबूपासून बनवलेले फर्निचर यांचे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. दुकानात बांबूपासून बनवलेल्या फुलदाण्या, शोभिवंत वस्तूही सहज मिळतात. पण भिंतीवर एखादे सूप, पंखासुद्धा सुंदर दिसतो. बोन्‍झाय केलेली बांबूच्या झाडांचा उपयोगही सजावटीसाठी केला जातो.

 
 
webdunia
स्टी
घर आधुनिक दिसावे यासाठी अनेकजण स्टील थीमचाही वापर करतात. ब्लॅक अॅण्ड व्हाइट रंगसंगतीचा वापर भिंती रंगवण्यासाठी केला जातो. थीमप्रमाणे घरातल्या फर्निचरपासून सजावटीच्या वस्तूंपर्यंत शक्य तिथे स्टीलचा वापर केला जातो. याप्रमाणेच काच टेराकोटा, फेरोसिमेंटची डिझायनर भिंत यांचा वापर करून थीम करता येते. ट्रेडिशनल लूक म्हणजे घरात आधुनिक सुविधा सगळ्या असाव्यात पण त्याचे स्वरूप गावाकडे झुकणारे असावे. त्यासाठी भिंतीना मातीचा मुलामा देऊन त्यावावर वारली चित्रे काढली जातात. लाकडी फ्रेमचे फोटो, लाकडी फुलदाण्या, कलाकुसरीने सज्ज दरवाजे, फर्निचरचा वापर केला जातो. फुलदाणिऐवजी घंगाळे किंवा तांब्याच्या शोभिवंत वस्तूंचाही वापर केला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ह्या 6 वस्तूंचे सेवन करा आणि कॅन्सरला दूर पळवा