फर्निचरसुद्धा घराच्या साज-सज्जेचा महत्त्वपूर्ण भाग असतो. बदलणाऱ्या काळात फर्निचरचे डिझायनसुद्धा बदलत आहे. आजकाल लाकडाच्या फर्निचर बरोबरच केन (बाँस) पासून तयार फर्निचर घराची शोभा वाढवत आहे.
केन पासून तयार फर्निचरांची विशेषता म्हणजे त्याला कधी दिमक लागत नाही. पण लाकडाच्या फर्निचरला नेहमी दिमक लागण्याची शक्यता असते. म्हणून केनचा फर्निचर लकड्याच्या फर्निचरापेक्षा जास्त टिकाऊ असतो.
या फर्निचरमध्ये खुर्चीपासून अल्मारीपर्यंत सर्व काही बाजारात उपलब्ध आहे. त्या शिवाय केनच्या फर्निचरमध्ये डायनिंग टेबल सेट, सोफा, टेबल सर्वच बाजारात सामान्य किमतीत उपलब्ध आहे. केनच्या फर्निचर वर पॉलिशिंग करून त्याला अजून चमकदार व आकर्षक बनवू शकता.