Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रा खरेदी करण्यापूर्वी वाचा हे 7 टिप्स

ब्रा खरेदी करण्यापूर्वी वाचा हे 7 टिप्स
बाजारात अनेक विकल्प असले तरी अनेकदा स्त्रिया चुकीची ब्रा निवडतात. केवळ ब्रा खरेदी करण्याचे नियम माहीत नसल्यामुळे ही चूक घडते आणि महागड्या ब्रा घेऊन सुद्धा त्या कंफर्ट जाणवत नाही. योग्य ब्रा निवडण्यासाठी वाचा हे टिप्स:
कोणत्या प्रकाराची ब्रा निवडावी
ब्रा खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या प्रकाराची ब्रा घेयची आहे. स्तन मोठे दिसण्यासाठी पॅडेड ब्रा निवडणे योग्य ठरेल. एक्स्ट्रा सपोर्ट साठी ब्रा निवडायची असल्यास अंडरवायर ब्रा निवडणे योग्य ठरेल. स्पोर्ट्स, जिम आणि इतर अॅथलिट उद्देशून ब्रा खरेदी करायची असल्यास स्पोर्ट्स ब्रा निवडा.
 
ऑनलाईन घेणे टाळा
ब्रा ऑनलाईन खरेदी करणे चुकीचं ठरेल. यासाठी विशेष दुकानांतूनच खरेदी करायला हवी. खरेदी करण्यापूर्वी फिटिंग आणि कंफर्टसाठी ट्रायल घ्यायला हरकत नाही. जर आपण ब्रँड, साइज आणि प्रकाराबद्दल ठाम असाल तरच ऑनलाईन खरेदीचा विचार करा.

मोकळा श्वास
ब्रा अशी निवडा ज्यात आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. अती टाइट ब्रा घातल्याने श्वास घ्यायला तर त्रास होतोच स्कीनवर त्याचा परिणाम होतो.
 
स्तन बाहेर दिसता कामा नये
ज्या ब्रातून आपले स्तन बाहेर निघत असतील अशी ब्रा खरेदी करणे टाळा.
 
ब्रा सरकता कामा नये
ब्रा ची स्ट्रीप लूज असल्याने खांद्यावरून सरकत राहते. अशात स्ट्रीप टाइट करून साइज नीट करा.
webdunia
वाकून बघा
ब्रा घातल्यावर पुढील बाजूला वाकून बघा की आपले स्तन बाहेरच्या बाजूला निघत तर नाहीये. असे असल्यास ती ब्रा आपल्यासाठी फीट नाही.
 
बाजूकडून चेक करा
डाव्या आणि उजव्या बाजूला वळून बघा. साइडहून स्क्रीन बाहेर निघत असल्यास त्याची फिटिंग योग्य नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गुळवेल' म्हणजेच अमृतकुंभ!