Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Omicron पासून संरक्षणासाठी घर अशा प्रकारे स्वच्छ करा Home Sanitization

hotel cleaning
, शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (11:54 IST)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने लोक हैराण झाले आहेत. महानगरांमध्ये नवीन कोरोना विषाणू ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. अशात या व्हायरसशी लोकांचे युद्ध सुरू झाले आहे. संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल तर सॅनिटायझेशन किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. 
 
कोरोना इंफेक्शनपासून या प्रकारे करा बचाव
कोरोनाच्या काळात व्हायरस दूर ठेवण्यासाठी घराचे दरवाजे, खिडक्या, टेबल, स्विच बोर्ड, सिंक आणि दरवाजाचे हँडल रोज स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी डायसोल्युशन वापरु शकता. डायसॉल्यूशन बनवण्यासाठी 1 चमचा अँटीबॅक्टेरियल सॉल्यूशन 1 कप पाण्यात घालून मिक्स करा.
 
नियमितपणे लादी पुसून टाका. घरातील फ्लोअर सर्वात गलिच्छ ठिकाण असतं. फरशी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात अँटीबॅक्टेरियल सॉल्यूशन किंवा फिनाइल वापरू शकता. 
 
घरातील कार्पेट आणि पडदे रोज स्वच्छ केले जात नाहीत, त्यामुळे येथे सर्वाधिक बॅक्टेरिया जमा होतात. आपण त्यांना गरम पाण्यात साबण टाकून स्वच्छ करू शकता. 
 
कोरोनापासून वाचण्यासाठी हाताच्या स्वच्छतेता महत्त्वाची आहे. घराची सफाई करताना हातमोजे घाला किंवा साफ केल्यानंतर सुमारे 20 सेकंद साबणाने हात चांगले धुवा.
 
डस्टबिनमध्ये सर्वाधिक बॅक्टेरिया असतात अशात डस्टबिनला स्पर्श कराल तेव्हा हात पूर्णपणे स्वच्छ करा. कचऱ्याला स्पर्श केल्यानंतर हात साबणाने चांगले धुवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घसा खवखवत असेल किंवा दुखत असेल तर हे घरगुती उपाय करा