Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Negative People नकारात्मक लोकांना कसे ओळखाल

negative
, बुधवार, 18 जानेवारी 2023 (21:21 IST)
ज्या लोकांबरोबर आम्ही वेळ घालवता त्यांचा आमच्या जीवनावर नकळत प्रभाव पडतो. कधी ना कधी आम्ही देखील त्यांच्यासारखे बोलू व वागू लागतो, ही मानवीय प्रकृती आहे ज्याला सर्वजण करतात आणि याला बदलने फारच अवघड आहे, कारण संगतीचा असर मस्तिष्कावर पडतो आणि मस्तिष्क एक जटिल अवयव आहे, ज्याला समजणे अशक्य आहे.  
 
बर्‍याच वेळा आम्ही आपल्या मोठ्यांकडून असे ऐकले आहे की योग्य व्यक्तीसोबत मित्रता ठेवायला पाहिजे. चांगली संगत, चांगले मित्र आणि योग्य लोकांसोबत राहणे नेहमीच योग्य असतं. पण बर्‍याच वेळा आम्हाला हे कळत नाही की ज्या लोकांबरोबर आम्ही राहत आहोत किंवा जे आमच्या जवळपास आहे ते किती बेकार आणि नकारात्मक विचारसरणीचे असतात.  
 
म्हणून, योग्य आहे की असल्या प्रकारच्या व्यक्तींना ओळखा आणि त्यांच्याशी दुरी कायम करा. असे लोक कधीही कोणाचा भला करू शकत नाही. जाणून घ्या असल्या प्रकारच्या लोकांचा स्वभाव कसा असतो :   
 
मन दुखवणारे - असे लोक आपल्या गोष्टींमुळे किंवा आपल्या कामांमुळे रोजच कुणाचे तरी मन दुखवत असतात. ते नेहमी प्रयत्न करत असतात की तुमचे नेहमी चांगले व्हावे पण तुम्हाला निराश करण्याची एकही संधी ते सोडत नाही. अशा लोकांना स्मार्टली हँडल करता यायला पाहिजे आणि त्यांच्याशी भावनात्मक दुरी कायम ठेवायला पाहिजे. नाहीतर तुमच्यात ही ह्या सवयी लागू शकतात.
 
सतत परेशान राहणे - असे लोक नेहमी परेशान असतात. ते जीवनात कधीही खूश राहू शकत नाही. त्यांना जीवनात नेहमी समस्या असतात. मग परिस्थिती कितीही चांगली का न असो, नेहमी त्यांना तक्रार आणि समस्या राहतात. वेळ राहता या लोकांपासून दूर होणे गरजेचे आहे, नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही देखील निराशाच्या गोत्यात जाल.   
 
तुम्हाला हतोत्‍साहित करणारे - जे लोक तुम्हाला कुठलेही काम करण्यासाठी प्रेरित करत नाही, बलकी नेहमी हतोत्‍साहित करतात ते लोक  टॉक्सिक असतात. असे लोक जीवनात नकारात्मकता घेऊन येतात. जेवढे शक्य असेल असल्या प्रकारच्या लोकांपासून दूर राहायला पाहिजे. 
 
दुसर्‍यांबद्दल नेहमी खराब बोलणारे - विषारी स्वभावाच्या लोकांशी जेव्हा तुम्ही गोष्टी कराल ते दुसर्‍यांबद्दल नेहमी चुकीचेच बोलतात. अशाने तुमच्या विचारात देखील प्रभाव पडतो. म्हणून योग्य असेल की अशा लोकांपासून दूर राहिला पाहिजे.
 
नेहमी दुखी आहे असे दर्शवतात - असे लोक नेहमी दुखी आहे आणि त्यांच्यावरच सर्व संकट आले आहे. अशा लोकांना आपले रडगाणे ऐकवण्यात फार मजा येतो. त्यांना अस वाटत असत की सर्व संकट त्यांच्याच समोर आहे, असल्या प्रकारच्या लोकांपासून स्वत:चा बचाव  करा.   
 
स्वत:च्या दोषांकडे काणाडोळा करतात - असे लोक आपल्या चुका किंवा आपल्या दोषांकडे दुलर्क्ष करतात. त्यांना असं वाटत की ते जे काही करत आहे ते योग्य आणि दुसरे जे काही करत आहे ते चुकीचे. आपल्या चुका बघण्याबद्दल दुसर्‍यांचे दोष बघत राहतात.   
 
दुर्व्यसनी असणे - तुमचे काही जाणकार असे ही असतील ज्यांना कुठली सवय असेल जसे - सोशल नेटवर्किंग साईटवर राहण्याची, टीव्हीची, खरेदी करण्याची किंवा स्वत:कडे नेमही लक्ष्य देण्याची. अशा लोकांची सवय लवकर जात नाही आणि त्याच्या तुमच्या व्यवहारावर चुकीचा प्रभाव पडतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हीही हिवाळ्यात खूप गरम पाणी पीता का ? होऊ शकतात हे नुकसान