Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांची शाळेत जाण्यासाठी मनाची किती तयारी, कशी दूर होईल भीती ?

मुलांची शाळेत जाण्यासाठी मनाची किती तयारी, कशी दूर होईल भीती ?
, मंगळवार, 26 मे 2020 (11:12 IST)
केंद्र सरकार झोन प्रमाणे शाळा पुन्हा सुरु कऱण्याचा विचार करत आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम शाळा सुरु करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर १६ मार्चपासून शाळा बंद आहेत. परंतू प्रश्न असा आहे की लहान मुलांकडून सुरक्षेचे कडक नियम पाळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते का? आणि 30 टक्के हजेरीसोबत जरी शाळा सुरु गेल्या तरी मुलांची तशीच पालकांची त्यांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी आहे का? शाळा पुन्हा सुरु करण्यासंबंधी अधिकृत सूचना कधीही येऊ शकते परंतू त्यापूर्वी पालकांना गरज आहे मुलांची मानसिकरुपाने तयार करण्याची. 
 
प्रशासनाकडून तसेच शाळेकडून नियम पाळणे जातील अशी अपेक्षा असली तरी घरी मुलांना यासाठी तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काही गोष्टी पालकांनी आवर्जून समजून घ्यायला हव्या आणि मुलांसोबत वागताना लक्षात ठेवायला हव्या.
 
मास्क, ग्लोव्ह्ज घालणे, थर्मल स्कॅनिंग, सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे तर नियामानुसार होत राहील पण त्यांची मानसिक तयारी या प्रकारे करु शकता.
आपण मुलांशी ईमानदारीने यावर चर्चा करयला हवी. परंतू त्यांच वय काय हे जाणून चर्चेला विस्तार द्यावा. 
मुलं लहान असल्यास किंवा सात- आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना या आजारातून बाहेर पडणे शक्य असल्याचं आश्वासन द्यावं. आपल्याला काहीही कल्पना नसली तरी त्यांना सकारात्मक बाजू दाखवणे गरजेचे आहे.
सोबतच त्यांना सशक्त करण्याची गरज आहे. सशक्त करणे म्हणजे त्यांना यांची समजूत देणे की संसर्गाचा धोका कशा प्रकारे टाळता येऊ शकतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना याबद्दल माहीती देताना आपली बोलण्याची टोन साधी असावी न की भीतीदायक.
त्यांना हात कसे धुवायचे, लोकांपासून किती लांब राहयचे, तसेच वारंवार तोंडात हात टाकणे किंवा चेहर्‍यावर हात फिरवण्याची सवय कशा प्रकारे सोडवावी हे अगदी प्रेमाने समजवून सांगायला हवे.
त्यांता टिशूचा वापर करुन डस्टबिनमध्ये फेकणे तसेच वारंवार हात धुणे, स्वच्छता बाळगणे याबद्दल सांगावे.
त्यांना भरपूर प्रश्न विचारु द्या आणि शक्योतर त्याचे सकारात्मक उत्तर द्या. जसे की सावधगिरी बाळगली तर यापासून वाचता येऊ शकतं किंवा घरातील सर्व लोकं सुरक्षित आहे कारण आपण नियमांचे पालन करत आहोत. तसेच यात सामान्यपणे आजार होतो तशाच प्रकारे एक- दोन दिवस वेदना सहन कराव्या लागतात आणि आजार पूर्णपणे बरा होता.
त्यांना सर्व सूचना दिल्यावर लगेच हलक्या फुलक्या मनोरंजक सांगाव्या ज्याने त्यांना गार्भीयही कळेल पण भीती बसू नये हे ही सुनिश्चित करता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hair Care : मजबूत केसांसाठी आहारात सामील करा या वस्तू