Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर लहान-सहान गोष्टींवर मूड खराब होत असेल तर हे करुन बघा

जर लहान-सहान गोष्टींवर मूड खराब होत असेल तर हे करुन बघा
, सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (08:25 IST)
रोजची धावपळ, मुलांचा सांभाळ, आणि स्वत:ला फिट ठेवण्याची जिद्द, अशात ताणतणावाचा नियोजन करायलाच हवं. बरेचदा नोकरी आणि घराची जबाबदारी पेलताना महिला गुरफयटतात आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग सुरू होते ती चिडचिड, वैताग आणि मूडच जातो. आता मूड खराब झाल्यावर तो चांगलं तर करायलाच हवा. त्यासाठी काही सोपे उपाय:
 
* स्वत:ला थोडा वेळ द्या. एखाद्या बागेत फिरायला जा. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्याने ताण निवळतो आणि ताजंतवानं वाटतं. बागेतील हिरवाई आपलं मन मोहवून टाकते. कामाचा उत्साह दुपटीने वाढतो. निसर्गाच्या सानिध्यात शरीरातल्या पेशी आणि नसांचा थकवा दूर होतो, मनातले नकारात्मक विचार दूर होतात. बागेत जाऊन मोकळ्या वार्‍यात दीर्घ श्वास घ्या. स्वत:शी संवाद साधा.
 
* महिलांच्या डोक्यात बर्‍याच विचरांचा कोलाहल सुरू असतो. त्यांना मर्यादित वेळेत बरंच काही करायचं असतं. मुलांचा डबा तयार करण्यापासून त्यांचा अभ्यास घेण्यापर्यंतच्या कामांची मोठी यादी तयार असते. अशा वेळी जवळ एक वही ठेवा. कामांची यादी करा. वेळखाऊ कामं सकाळच्या वेळी करा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा.
 
* स्वत:च्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यात बी 12 आणि ड जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते. बी 12 च्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. हे टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं आहारात समाविष्ट करा. फळांमधल्या नैसर्गिक साखरेमुळे ऊर्जा मिळते. सुक्यामेव्यामुळे मॅग्नेशियम मिळतं. नैसर्गिक शर्करेचं ऊर्जेत रूपांतर होतं. शक्यतो कुकीज, केक, बिस्किटं असे पदार्थ टाळा.
 
* आपले विचार व्यक्त करा. फेसबुक, ट्विटरवर अती नको तरी अॅक्टिव्ह राहा. अशा प्रकारे मित्र जोपासण्याची गरज असते हे लक्षात घ्या, त्यामुळे थोडं सोशल साईट्सवर सक्रिय राहा.
 
* दिवसातून किमान अर्धा तासाचा वेळ आपल्या हॉबीसाठी काढा. पेंटिंग, म्युझिक, डांस, बागवानी काही का असो, ही वेळ आपणं दिल्यावर फ्रेश वाटेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चॉकलेटी वॉलनट कुकीज