Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेटी वॉलनट कुकीज

चॉकलेटी वॉलनट कुकीज
, सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (08:19 IST)
साहित्य : 1 कप मैदा, 1/2 कप पीठी साखर, 1/2 कप क्रीम, 1 चमचा लोणी, 1/2 लहान चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बारीक चॉकलेट, 1 चमचा किसमिस, लाल हिरवी केक पिल्स (गोळ्या), बारीक कतरलेले अक्रोड.
 
कृती : सर्वप्रथम मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीने चाळून घ्यावे. क्रीम, साखर आणि लोणी घालून चांगले फेटून घ्यावे. ह्या मिश्रणात मैदा ‍व बेकिंग पावडर व इतर साहित्य घालून चांगले एकजीव करावे. 1/2 तासासाठी मिश्रणाला फ्रीजमध्ये ठेवावे. नंतर त्याला पोळीसारखे जाडसर लाटून घ्यावे व गोल कुकीज तयार करावे. माइक्रोवेवमध्ये 180 डिग्री सेंटीग्रेडवर 15 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर चॉकलेटी कुकीज सर्व्ह करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त ब्रोकोली