Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फर्निचरला वाळवी लागली असल्यास हा सोपा उपाय अवलंबवा, वाळवीचा नायनाट होईल

फर्निचरला वाळवी लागली असल्यास हा सोपा उपाय अवलंबवा, वाळवीचा नायनाट होईल
, मंगळवार, 15 मार्च 2022 (22:02 IST)
प्रत्येकजण आपले घर सजवतो. लोक अनेकदा त्यांचे घर सजवण्यासाठी महागडे फर्निचर खरेदी करतात. पण जर फर्निचरमध्ये वाळवी शीरली तर महागड्या फर्निचर खराब होतो. विशेषतः उन्हाळा किंवा पावसाळ्यात वाळवी लागते. ज्या वस्तूंना वाळवी लागते त्या वस्तूंना वाळवी आतून पोकळ करून टाकते.  अशा परिस्थितीत आपल्या घरातील फर्निचरला वाळवी पासून वाचवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
 
फर्निचरमध्ये पाणी लागल्याने ते खराब होऊ लागते आणि त्यात वाळवी  लागते. हे टाळण्यासाठी घरातील फर्निचरभोवती पाणी साचू देऊ नका. वाळवी ओलसर किंवा आद्र्रता असलेल्या ठिकाणी अधिक वाढतात, म्हणून ही समस्या दूर करा.
 
* जर फर्निचरला वाळवी लागली असेल तर ते उन्हात वाळवा. अंधार असलेल्या ठिकाणी वाळवी  अधिक वाढतात. अशा स्थितीत सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे वाळवीचा नायनाट होतो. 
 
* जर फर्निचरमध्ये वाळवी लागली असेल तर त्यावर मीठ टाका. मिठाच्या वापराने हळूहळू वाळवी नाहीशी होईल.
 
* कडू गोष्टी देखील वाळवींना मारतात. फर्निचरमध्ये वाळवी  आढळल्यास त्या ठिकाणी कडुलिंबाची पावडर शिंपडा. याशिवाय पाण्यात लिंबू आणि कारले उकळून त्या पाण्याने फर्निचरही स्वच्छ करू शकता.
 
* वाळवीचा नायनाट करण्यासाठी साबणयुक्त पाण्याचा वापर करू शकता. यासाठी डिश वॉश  4 कप पाण्यात विरघळवून घ्या आणि या द्रावणाने फर्निचर दररोज स्वच्छ करा.
 
* फर्निचरमधून वाळवी काढून टाकण्यासाठी, आपण फर्निचरजवळ थोडे ओले लाकूड ठेवले. ओल्या लाकडाचा वासामुळे वाळवीचा नायनाट होईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Relationship Tips : सासू-सुनेच्या नात्यात गोडवा येईल, या गोष्टी लक्षात ठेवा