Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपले पती देखील आपल्यापासून काही लपवतात कारणे जाणून घेऊ या

आपले पती देखील आपल्यापासून काही लपवतात कारणे जाणून घेऊ या
, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)
नवरा बायकोचं नातं हे दोन शरीर पण एक जीव असे आहे. ते दोघे एकमेकांशी सर्वकाही सामायिक करतात. मग ते दुःख असो किंवा आनंद असो. त्या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले असते पण तरीही पती आपल्या पत्नीपासून काहीतरी लपवत असतात, ह्यामागे बरेच कारणे असू शकतात. परंतु जर बायकोला त्याच गोष्टी इतरांकडून कळल्यावर त्या विचारात पडतात की काय खरंच त्यांच्या मधील नाते घट्ट नाही की नवऱ्याने त्या सर्व गोष्टी सामायिक करायला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा त्या गोष्टी बायकोला सांगण्याच्या मागील त्यांचा हेतू एवढाच असतो की त्या गोष्टीमुळे त्यांच्या चांगल्या चाललेल्या नात्यात कोणत्याही प्रकारचा तणाव येऊ नये. म्हणून ते त्या गोष्टी बायकोला सामायिक करत नाही. चला तर मग जाणून घेऊ या कोणती आहे ती कारणे.
 
1 आर्थिक टंचाई -
जर पुरुष कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाला सामोरी जात आहे तर ह्या विषयात महत्त्वाचे असल्यावरच आपल्या पत्नीला सांगतात. कारण त्यांना असं वाटतं की ते या प्रकरणाला स्वतः हाताळू शकतात. बायकोला या विषयाबद्दल सांगून तिला तणाव देऊन काहीच फायदा होणार नाही अशा स्थितीत  ते स्वतःच आर्थिक व्यवस्थापन करतात आणि बऱ्याचदा स्वतःच्या खर्चात कमी करतात. 
 
2 महिला मित्र- 
बरेच पुरुष आपल्या महिला मित्रांबद्दल  बायकोला सांगायला संकोच करतात कारण त्यांना ह्याची अजिबात कल्पना नसते की या वर त्यांची बायको कशी प्रतिक्रिया करेल. त्यांना भीती असते की या मुळे त्यांच्या नात्यात दुरावा न येवो. लग्नापूर्वीच असलेल्या मैत्रिणीशी असलेलं नातं लग्नानंतर अचानक संपविता येणं अशक्य असत. म्हणून नवरा आपल्या बायकोला मैत्रिणी विषयी सांगत नाही.
 
3 पार्टी- 
बरेच पती आपल्या मित्रांसह पार्टीची योजना आखतात तर ते बायकोपासून लपवतात. असं होणं तेव्हा शक्य आहे जेव्हा बायको नवऱ्याच्या त्या मित्रांना नापसंत करते किंवा पार्टी मधील होणाऱ्या काही गोष्टींनी चिडते. म्हणून नवरे पार्टीमध्ये जाण्याचा कोणता न कोणता बहाणा करतात. किंवा गोष्ट लपवून आपल्या मित्रांसह पार्टीला जातात. त्यांना असं वाटते की पार्टीला जायचे आहे असं सांगितले तर त्यांच्या मध्ये भांडण होऊ शकतात.    
 
4 नापसंत असलेल्या सवयी -
असं आवश्यक नाही की दोन लोक बरोबर राहत आहे तर त्यांना एकमेकांची प्रत्येक गोष्ट आवडत असेल. दोन वेगवेगळ्या लोकांच्या सवयी  देखील वेगवेगळ्या असू शकतात. काही सवयी ना आवडणाऱ्या असतात. बायकांना नवऱ्याची कोणती सवय आवडत नसेल तर त्या सहजपणे त्यांना सांगतात.परंतु पुरुषांना बायकांना सांगायला अवघड होत. आणि ते पत्नीला त्यांच्या नावडत्या सवयी सांगू शकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्भधारणे दरम्यान योगासन करताना अशी काळजी घ्या