Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्भधारणे दरम्यान योगासन करताना अशी काळजी घ्या

गर्भधारणे दरम्यान योगासन करताना अशी काळजी घ्या
, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (18:42 IST)
गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते. कारण त्या दोनजीवांच्या असतात. आणि बाळाचे भविष्य देखील तिच्याशी जुळलेले असते. गरोदरपणात शारीरिक दृष्टया निरोगी असण्यासह मानसिक दृष्टया देखील निरोगी असणं देखील महत्त्वाचे आहे. ज्या स्त्रिया गरोदरपणात आनंदी राहतात त्यांचे बाळ देखील आनंदी आणि निरोगी असतात. या काळात डॉक्टर स्त्रियांना काही सोपे योग करण्याचा सल्ला देतात. परंतु या काळात केले जाणारे योग सामान्य योगा पेक्षा वेगळे असतात कारण या काळात काळजी घेणं महत्त्वाचे असते. या काळात केलेला निष्काळजीपणा आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यास काहीही दुष्परिणाम करू शकतात. आज आम्ही सांगत आहोत की या काळात योग करताना कोणत्या काळजी घेणं महत्त्वाचे आहे.  
 
1 कठीण आसन करू नये-
गर्भधारणेच्या सुरुवातीस आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यावयाची आहे की आपण कोणतेही  कठीण आसन करू नका. किंवा असे कोणते ही आसन ज्यांना करताना ते आपल्याला अवघड वाटतील करू नका. ओटीपोटावर जोर पडणारे आसन अजिबात करू नका. एखाद्या योग प्रशिक्षकाचा सल्ला घ्या.  स्वतःहून चुकीचे आसन  करू नका अन्यथा आपण केलेल्या एखादे चुकीचे आसन देखील आपल्या शरीरास हानी देऊ शकतात. 
 
2 उभे असणारे आसन करावे -
गरोदरपण्याच्या सुरुवातीच्या तीन महिन्या दरम्यान आपल्याला नियमित उभे असणारे आसन करावे. हे आसन केल्यानं आपल्या पायाचे स्नायू बळकट होतील आणि शरीरात रक्त विसरणं चांगले होईल, वारंवार पायात येणारी सूज देखील कमी होईल आणि शरीरात ऊर्जा टिकून राहील ज्यामुळे पुन्हा पुन्हा आळशी पणा जाणवणार नाही. 
 
3 10 ते 15 आठवडे आसन करू नका- 
 गरोदरपणातील मध्यम काळ आई आणि बाळा दोघांसाठी  महत्त्वाचा असतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये जिथे आई कमकुवत असते, डॉक्टर त्यावेळी बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देतात. परंतु आवश्यक आहे की या काळात मानसिक आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. जरी आपण कोणतेही आसन केले नाही तरी सुखासनात बसून थोड्या वेळ ध्यान करून प्राणायाम करावं. असं केल्यानं आपल्याला आरोग्याशी निगडित फायदे होतील. 
 
4 आपल्या क्षमतेपक्षा कमी व्यायाम करा- 
सामान्यपणे जेव्हा आपण योगासन करतो त्यावेळी आपल्या शरीरातील कोणत्याही भागाला क्षमतेनुसारच वळवतो किंवा कधीतरी क्षमतेपेक्षा जास्त करतो. परंतु गरोदरपणात असं काही करायचे नाही आपल्या क्षमतेपेक्षा कमीच करायचे आहे. असं केल्याने आपल्या शरीराला आणि बाळाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वयाच्या 40 व्या वर्षी तरुण दिसण्यासाठी या टिप्स अवलंबवा