Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नातं मुली- वडिलांचे जगातील सर्वोत्कृष्ट वडील बनण्यासाठी टिप्स

नातं मुली- वडिलांचे  जगातील सर्वोत्कृष्ट वडील बनण्यासाठी टिप्स
, मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (21:49 IST)
वडील आणि मुलीचे नाते जगातील अतूट आणि प्रेमळ नाते आहे. या मध्ये कोणत्याही  प्रकारची भीती किंवा कोणत्याही प्रकारचा संकोच नसतो.  
सर्वात खास नाते म्हणजे वडील आणि मुलीचे नाते. वडील हे मुलीचे पहिले मित्र, संरक्षक आणि सूपरहीरो असतात. प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी लहानपणा पासूनच तिच्या प्रत्येक लहान लहान गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जेणे करून ती आनंदी राहावी .आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हसू बघण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात.परंतु कधीकधी या नात्यात अंतर येत. त्याचे कारण म्हणजे पिढीतील अंतर आहे. हे अंतर अधिक वाढू नये या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण या नात्याला अधिक दृढ करू शकता आणि जगातील सर्वोत्कृष्ट वडील बनू शकता. 
 
* मुलीचे ऐका- आपल्या मुलीशी नाते सुधारण्यासाठी तिचे म्हणणे ऐकून घ्या. तिचे काय म्हणणे आहे ते समजून घ्या. तिच्या इच्छा, स्वप्न काय आहेत ते जाणून घ्या. जेणे करून भविष्यात ती आपल्याकडे मन मोकळे करायला संकोच करणार नाही.
 
* तिला आधार द्या - बऱ्याच वेळा असे आढळून येते की मुलांकडून काही चुकल्यावर त्यांना आई वडील रागावतात.या मुळे त्यांच्या नात्यात अंतर येत. जर आपल्या मुलीकडून देखील काही चुका झाल्या असतील तर तिला रागावू नका तिला समजवा आणि आधार द्या. जेणे करून आपल्या मध्ये जवळीक येईल आणि तिला देखील जाणीव होईल की आपल्याला आधार देण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी आपले वडील पाठीशी आहे. 
 
* प्रोत्साहन द्या- आपण आपल्या मुलीला प्रत्येक लहान लहान गोष्टीसाठी प्रोत्साहित करा. असं केल्यानं आपल्या मध्ये नाते अधिक घट्ट होईल आणि मुलीला असे वाटेल की आपण तिच्या मधील आत्मविश्वास वाढवत आहात आणि गोष्टींना मिळविण्यासाठी प्रोत्साहन देत आहात. 
 
* विश्वास संपादन करा- मुलीचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. जो पर्यंत आपण तिचा विश्वास संपादन करत नाही तो पर्यंत ती आपल्याकडे काही गोष्टी सामायिक करणार नाही.  जर आपण अशी इच्छा बाळगता की आपली मुलगी आपल्याकडे मनमोकळे पणाने सर्व काही सामायिक करावे तर या साठी आपल्याला तिच्या विश्वासाला जिंकावे लागेल. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चविष्ट बेबी कॉर्न मंच्युरियन रेसिपी