बहुतेक लोकं आपल्या घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देतात. घराला नीट नेटकं ठेवणं पसंत करतात जेणे करून घर एकदम स्वच्छ आणि परिपूर्ण दिसून येत. पण घराच्या स्वयंपाकघरातील चिकट असलेल्या टाइल्स याला अपूर्ण करतात. जर का आपल्या घरातील स्वयंपाकघरातील टाइल्स देखील चिकट आणि घाणेरड्या असतील तर हे आपल्या घराचं सौंदर्य बिगडवू शकतं. मग आपण काय करावं ? जर आपणास आपल्या घरातील स्वयंपाकघराच्या टाइल्सला सोप्या पद्धतीने स्वच्छ करावयाच्या असतील तर या लेखात आम्ही आपल्याला सांगत आहोत काही सोप्या आणि चांगल्या टिप्स...
सांद्रता असलेल्या ब्लीचचा घोळ तयार करा. हे वापरण्याच्यापूर्वी ग्लव्स घालून घ्या. या घोळाने टाइल्सला चांगल्या प्रकारे घासून धुऊन घ्या.
व्हिनेगरच्या घोळाने टाइल्स स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये व्हिनेगर,मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र करून घोळ तयार करा. या घोळाने आपल्या स्वयंपाकघरातील टाइल्सला स्वच्छ करा. या घोळाने स्वच्छ केल्याने आपल्या टाइल्स उजळून निघतील.
पाण्यात डिटर्जंट मिसळून डाग स्वच्छ केल्याने आपल्याला चांगले परिणाम मिळू शकतील आणि टाइल्स देखील उजळून निघणार. या घोळाला आपण ब्रशच्या साह्याने आपल्या स्वयंपाकघरातील टाइल्सला स्वच्छ करू शकता.