Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Travel Tips : उन्हाळ्यात या गोष्टी प्रवाशांच्या बॅगेत असाव्यात, कोणतीही अडचण येणार नाही

Travel Tips : उन्हाळ्यात या गोष्टी प्रवाशांच्या बॅगेत असाव्यात, कोणतीही अडचण येणार नाही
, मंगळवार, 29 मार्च 2022 (15:31 IST)
उन्हाळ्यात भारतात प्रवास करणे कठीण असते. हा त्रास टाळण्यासाठी प्रवासाच्या बॅगेत असे सामान ठेवावे ज्यामुळे आपला उन्हाळ्याचा प्रवास आरामदायी होईल. अशा परिस्थितीत, आम्ही अशाच काही वस्तूंची यादी सांगत आहोत, ज्या उन्हाळ्याच्या प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या बॅगमध्ये असणे आवश्यक आहे.
 
1 सनग्लासेस- जर आपण उन्हाळ्यात प्रवास करत असाल तर बॅगेत सनग्लासेस जरूर ठेवा. ते केवळ आपल्याला स्टायलिश दिसण्यातच मदत करत नाहीत तर  डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे आपल्या बॅगेत उत्कृष्ट  दर्जाचा सनग्लासेस ठेवा. 
 
2 वेट वाईप्स आणि रुमाल- उन्हाळ्यात, घामामुळे संसर्ग होऊ शकतो, म्हणून आपण आपल्यासोबत टॉवेल आणि वेट वाइप्स ठेवावे आणि वेळोवेळी त्यांच्या मदतीने त्वचा स्वच्छ करावी. 
 
3 टोपी, स्कार्फ - कडक उन्हामुळे डोकेदुखी होऊ शकते. अशा वेळी, टोपी किंवा स्कार्फ असणे आवश्यक आहे. हे केवळ आपल्या चेहऱ्याचे संरक्षण करत नाही तर उष्णतेपासून डोक थंड ठेवण्यास देखील मदत करते.
 
4) फेस आणि बॉडी मिस्ट - उन्हाळ्यात उन्हामुळे त्वचा निस्तेज होते. अशा परिस्थितीत, आपल्या पर्समध्ये फेस  आणि बॉडी मिस्ट ठेवा. त्वचा निस्तेज वाटली की लगेच चेहऱ्यावर स्प्रे करा.
 
5) सनस्क्रीन- टॅनिंग टाळण्यासाठी, बॅगमध्ये सनस्क्रीन लोशन ठेवा, ते आपल्या त्वचेचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करेल. अशावेळी चांगला एसपीएफ असलेले सनस्क्रीन लोशन वापरा.  
 
6) उन्हाळी कपडे- अंगावर घट्ट फिटिंगचे कपडे परिधान केल्याने बॉडी शेप चांगला दिसतो, परंतु उन्हाळ्यात ते चुकीचे ठरू शकते. उन्हाळ्यात प्रवासात सैल सुती कपडे ठेवा, असे कपडे आरामदायक असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आंबेडकरनगर: प्रज्ञा बागुल यांचा वैशिष्टये पूर्ण कथासंग्रह