टी बॅग्स एकदा वापरल्यावर फेकून देतो. या बॅग्स फेकून न देता आपण पुन्हा वापरू शकतो. कसे काय चला तर मग जाणून घेऊ या.
* फ्रीजमधून वास येणं- बऱ्याचदा फ्रीजमधून वास येऊ लागतो. फ्रीज बऱ्याच काळ बंद असल्यास त्यामधून वास येतो.अशा परिस्थितीत या टी बॅग्स फ्रीज मध्ये एखाद्या कोपऱ्यात ठेवले तर वास नाहीसा होतो.
* घाणेरडी भांडी स्वच्छ करणे- घाणेरडी भांडी स्वच्छ करणे हे खूपच कठीण काम आहे. या टी बॅग्स ने घाणेरडी भांडी स्वच्छ करणे सोपे होईल. या साठी घाणेरड्या भांडीत गरम पाणी घालून या टी बॅग्स त्यात घालून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी स्वच्छ करा. भांडी स्वच्छ होतील.
* एयर फ्रेशनर- टी बॅग्स आपण एयर फ्रेशनर म्हणून देखील वापरू शकतो. वापरून झाल्यावर यांना उन्हात कोरडे करा. नंतर कोणत्याही आवडीच्या तेलाच्या काही थेंबा या वर घालून खोलीत,स्नानगृहात,टांगून द्या. सुवास येईल.
* तोंडात छाले झाले असल्यास- तोंडात छाले झाले असल्यास वापरून झाल्यावर टी बॅग्स फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा .नंतर यांना छाले असलेल्या जागी ठेवा. तोंडाच्या छाल्यापासून मुक्ती मिळेल.