Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलांच्या पँटीच्या मध्यभागी पॅच का दिसतो, का उडून जातो येथील रंग ?

महिलांच्या पँटीच्या मध्यभागी पॅच का दिसतो, का उडून जातो येथील रंग ?

रूपाली बर्वे

, गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (16:23 IST)
काळ कितीही आधुनिक असो आज ही महिला कपडे वाळत घालताना स्वत:ची पेंटी कोपर्‍याला किंवा अशा बाजूला वाळत घालणे पसंत करते ज्यावर कुणाचीही नजर पडू नये. किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी पँटी वाळवण्याची गरज पडली तर त्यावर टॉवेल घालून झाकण्याचा प्रयत्न करते. याचे एक मोठे कारण म्हणजे पँटीच्या मधोमध पडलेला पॅच ज्यामुळे त्या जागेचा रंग फिकट झालेला असतो. पण कधी यावर विचार केला आहे का यामागील कारण काय. हा प्रश्न किती तरी महिलांना पडत असला तरी कधी यावर चर्चा झालेली नाही तशीच कुणीही याबद्दल गंभीर विचार केला नाही.
 
आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की विकसित देशांमध्ये देखील महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्स आणि त्यांच्या आरोग्यासंबंधी विषयांवर बोलणे टाळले जाते तर आपल्या देशात यावर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. पण जेव्हा गोष्ट आरोग्याची काळजी घेण्याबाबत असेल तर चर्चा नाही पण आवश्यक माहिती तरी असलीच पाहिजेच.
 
सर्व महिलांनी याचे निरीक्षण केलेच असेल की किती ही सुंदर पँटी खरेदी केली तरी काही दिवसात त्याच्या मध्यभागी पॅच दिसू लागतो अर्थातच तेथील रंग उडालेला असतो.
 
हे पॅचेस धुतल्यावरही निघत नाही. विशेष करुन डॉर्क रंगाच्या पँटीत हे स्पष्ट दिसून येतात. पण आपण हा विचार केला आहे का पँटीवर या प्रकाराचे डाग पडण्यामागील  कारण आहे तरी काय? तर याचे उत्तर आहे योनी. याचे सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी आपण योनीची संरचना समजून घेऊया- 
 
योनीची संरचना
योनी हे तंतुस्नायुमय नलिकाकृती जननेंद्रिय आहे. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. ही त्वचेच्या अनेक थरांनी बनलेले असते जे अंतर्गत अवयवांना संरक्षण प्रदान करते. स्त्रियांची योनीबाहेरील लेबियाची थर योनी स्वच्छ ठेवण्यास मदत करते. व्यस्कर महिलांमध्ये ही सर्व बाजूंनी केसांनी वेढलेली असते. वल्वा म्हणजे व्हजायनामध्ये नेहमीच जरा गरमी आणि ओलावा असतो. याचे कारण म्हणजे यूट्रसच्या माध्यमातून अनेक प्रकाराचे फ्लूइड बाहेर पडत असतात. योनीची विशेषता अशी की सतत स्वत:ची स्वच्छता राखत असते म्हणून येथे साबण लावण्याची देखील गरज नसते. केवळ पाण्याने देखील ही जागा स्वच्छ करता येते.
 
पँटीचा रंग का उडतो?
पँटीवर पॅच येण्याचे कारण म्हणजे योनीतून होणारा नैसर्गिक स्त्राव सामान्यतः अॅसिडिक असतो. त्यामुळे फॅब्रिकच्या संपर्कात आल्यावर ब्लीचिंगमुळे पांढरे डाग पडतात.
 
एमएस प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. कादंबिनी वाघ यांच्याप्रमाणे योनिमार्गातील स्राव आम्लयुक्त असतो आणि जर रुग्णाला इतर कोणतीही तक्रार नसेल तर ही प्रक्रिया सामान्य आहे.
 
होय, योनीतून स्त्राव नैसर्गिकरित्या अम्लीय असल्यामुळे पँटीच्या क्रॉच भागावर पांढरे किंवा पिवळे डाग पडतात. अॅसिडिटी pH मध्ये नापली जाते. जेव्हा एखाद्याची वेल्यू 7 पेक्षा कमी असते त्याला अॅसिडिक मानलं जातं. व्हजायनाच्या सामान्य पीएच पातळीबद्दल बोलायचे झाल्यास 3.6 ते 4.6 पर्यंत सामान्य पीएच श्रेणी असते.
 
जसे की आधीच उल्लेख केले आहे की योनीत ओलावा आणि गरमी असते ज्यामुळे येथे बॅक्ट‍ेरिया आणि फंगस होण्याची शक्यता अधिक असते अशात या संक्रमाणापासून बचावसाठी नैसर्गिकरित्या व्हजायनाची अॅसिडिटी वाढलेली असल्याने संक्रमण होण्याचा धोका कमी होतो.
webdunia
काय पँटीवर डाग वाईट संकेत आहे ?
नाही, योनीमध्ये लॅक्टोबॅसिली असे गुड बॅक्टेरिया असतात, जे आम्लताची इष्टतम पातळी राखून खराब बॅक्टेरियल इंफेक्शन होण्यापासून रोखतात आणि योनीला निरोगी ठेवतात. अॅसिडिक डिस्‍चार्ज वार्‍याच्या संपर्कात आल्याने ऑक्सीकरण यामुळे पँटीवर डाग पडू शकतात. या प्रकारे डिस्चार्ज योनीच्या स्वत:ची क्‍लीनिंग प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे. पण लक्षात घेण्यासारखे आहे की योनीद्वारे दररोज सुमारे 4ml डिस्चार्ज होतं मात्र अधिक प्रमाणात डिस्चार्ज होत असल्यास डॉक्‍टरांशी संपर्क करावा.
 
व्हजायना क्लिंन्झर प्रॉडक्टची गरज असते का ?
बाजारात अनेक प्रकाराचे व्हजायना क्लिंन्झर प्रॉडक्ट्स मिळतात ज्याचा वापर केल्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकतं. महिला याचा वापर करत राहतात कारण त्या कधीही मोकळेपणाने याची गरज आहे का नाही यावर विचारपूस करत नाही. व्हजायना क्लीनिंग प्रॉडक्ट्स वापरल्याने pH व्हॅल्यू कमी होते. अशात अॅसिडिटी कमी असल्यास संक्रमणचा धोका वाढू शकतो आणि संक्रमण वाढल्यास या प्रॉडक्ट्सचा अजूनच वापर करावा लागतो. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे उत्पादन वापरु नये.
 
नैसर्गिकरीत्या योनीची स्वच्छता आणि सुरक्षा
व्हजायनाच्या बाहेर लेबियाची थर सुरक्षा प्रदान करते. मांसल स्वरूपाची त्वचा केसांनी झाकलेली असते. डॉक्टरांच्या मते प्यूबिक हेअर जर्म्स आणि इंफेक्शन या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकाराच्या घर्षणपासून देखील बचाव करतात. हे केस एकाप्रकारे अतिरिक्त सुरक्षा कवच म्हणून काम करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बँक ऑफ इंडियामध्ये भरती Bank of India PO Recruitment 2023