Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ख्रिसमसच्या अगोदरच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान

ख्रिसमसच्या अगोदरच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान
, शनिवार, 24 डिसेंबर 2022 (15:45 IST)
मुंबई शेअर बाजारात ख्रिसमसच्या अगोदरच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण नागरिकांना ख्रिसमसवर सांतारॅलीची अपेक्षा होती. भारतीय भांडवली बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. तसे पाहिल्यास ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठय़ा प्रमाणात तेजीचे वातावरण राहते. मागील दोन दशकांमध्ये 80 टक्क्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये बाजारात तेजी असायची परंतु यावेळी ही तेजी नव्हती.
 
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी भारतीय भांडवली बाजारात शुक्रवार हा काळा दिवस ठरला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी कोसळला आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1.61 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 980.93 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 59,845.29 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 320.55 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक  17,806.80 अंकांनी प्रभावीत झाला आहे.
 
सेन्सेक्सची शुक्रवारी 60,205.56 अंकांवर सुरुवात झाली होती. ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 60,546.88 अंकापर्यंत वर चढला होता तर 59,765.56 अंकांची नीचांकी पातळीही सेन्सेक्सने गाठली होती. 30 मधील 29 समभाग नुकसानीसोबत बंद झाले आहेत.
 
Edited by- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग’ व ‘अभियांत्रिकी उद्योग’ या उद्योगांच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण