Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 19 April 2025
webdunia

संघटितपणाचे महत्त्व

story
, सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (15:18 IST)
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्‌-कदा चालणार्‍या भांडणामुंळे तो दुःखी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घड्यावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्राणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.
 
वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता आली नाही. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, 'बघितलंत ना? एकीचे बळ किती असते ते?' वडील एवढेच बोलले तवर ते सुज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने ते वागूलागले. 
 
तार्त्प : एकीचे बळ मोठे असते. भावाभावांनी एकोप्याने राहिलस त्यांचे सामर्थ्य वाढते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काही उपयोगाच्या आरोग्य टिप्स