Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

Amrkhand Recipe
साहित्य 
ताजे दही - 2 1/2 कप (500 ग्राम)
पिठीसाखर - 1/4 कप
मँगो पल्प - 1 कप
काजू - बादाम - 4
पिस्ता - 5-6
वेलची - 2
 
कृती : 
दह्याला जाड्या कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचं सर्व पाणी निथरल्यावर दही घट्ट झाल्यावर एका भांड्यात काढावं.
या दह्यात साखर घालून त्याला घोटून श्रीखंड तयार करावं. त्या मँगों पल्प, सुके मेवे, वेलची घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावं.
वरुन पिस्ता घालून गार सर्व्ह करावं.

टिप: आपण दही घरी देखील तयार करु शकता. यासाठी आदल्या रात्री दुध कोमट करून त्यात दोन चमचे विरजणाचे दही घालून मिसळून घ्यावे. नंतर धक्का लागणार नाही किंवा न हलवता भांङे एका जागी ठेवावे. सकाळपर्यंत छान घट्ट दही तयार होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळा विशेष रेसिपी थंडगार Beetroot Buttermilk