Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bread Pudding Recipe चविष्ट ब्रेड पुडिंग रेसिपी

Bread Pudding Recipe चविष्ट ब्रेड पुडिंग रेसिपी
, बुधवार, 15 जून 2022 (12:05 IST)
Bread Pudding Recipe  नाश्त्यासाठी ब्रेडपासून बनवलेल्या गोष्टी बहुतेक प्रत्येकाच्या घरात बनतात. तुम्ही स्वादिष्ट ब्रेड पुडिंग देखील बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ब्रेडचा हा नवीन पदार्थ नक्कीच आवडेल. ब्रेड पुडिंग बनवणे खूप सोपे आहे.
 
ब्रेड पुडिंगसाठी साहित्य
ब्रेड - 8-10 तुकडे
अंडी - 1
दूध - 1 कप
साखर - 3 टेस्पून
मीठ - 1 चिमूटभर
दालचिनी पावडर - 1 चिमूटभर
व्हॅनिला एसेन्स - 1/4 टीस्पून
मलई - 2 टेस्पून

ब्रेड पुडिंग कृती
ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी आधी ब्रेड बारीक करुन घ्या.
आता एका भांड्यात अंडी, दूध, साखर आणि 1 चिमूट मीठ मिक्स करा.
तुम्ही त्यात दालचिनी पावडर आणि व्हॅनिला इसेन्स देखील घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.
आता हे मिश्रण एका बेकिंग ट्रेमध्ये ठेवा आणि ओव्हनमध्ये 45 मिनिटे बेक करा.
पुडिंग बेक झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या आणि त्यानंतर पुडिंगला व्हीप्ड क्रीमने सजवा.
मस्त गोड पदार्थ तयार आहे, फ्रीजमध्ये थंड केल्यावर खाऊ शकता.
लहान मुलांना ही ब्रेड पुडिंग आवडेल. तुम्ही हे मुलांच्या पार्टीसाठी बनवू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Irregular periods अनियमित मासिक पाळीची समस्या कमी करण्यासाठी हे पदार्थ खा