Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुंदी रेसिपी

webdunia
मंगळवार, 27 एप्रिल 2021 (13:43 IST)
बुंदी साठी : बेसन - १ कप
तेल किंवा तूप - १ टेबलस्पून पिठासाठी 
तळण्यासाठी वेगळ्याने
साखर - १ कप
वेलदोड्याची पूड आवडीनुसार
बदामाचे काप किंवा बेदाणे आवडीनुसार
 
बेसनात १ टेबलस्पून तेल घाला. आता पाणी घालत पीठ भिजवून घ्या. पिठाचे गोळे होता कामा नये.  
एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करून नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा.
बुंदीचा झारा तेलावर ३-४ इंच वर धरून त्यावर पीठ ओतून पसरा.
पीठ आपोआप झाऱ्यातून तेलात पडले पाहिजे. नाही तर बुंदी योग्य आकारात पडत नाही.
पीठ तेलात पडायचे थांबल्यावर झारा बाजूला करून घ्यावे.
बुंदी तळून घ्यावी.
नंतर झारा पुन्हा वापरण्यापूर्वी कागदाने किंवा फडक्याने कोरडा करून घ्यावा.
बुंदी गुलाबीसर दिसेपर्यंत तळून घ्या.
 
बाजूला एका कढईत साखरेत १/२ कप पाणी घालून उकळून घ्या.
एक तारी पाक तयार करुन घ्या.
पाकात वेलचीपूड घाला.
आता तयार बुंदी पाकात घाला व सर्व मिसळून घ्या. 
बदामाचे काप किंवा बेदाणे घाला.
हे मिश्रण तास भर तसंच राहू द्या. 
मधून-मधून हालवत राहा.
आपली बुंदी तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

SBI Clerk Recruitment 2021 : एसबीआयमध्ये 5237 लिपिक पदांची भरती, गुणवत्ता, पगार, अर्जासह खास गोष्टी जाणून घ्या