Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेड स्लाइसपासून बनवा गुलाब जामुन

ब्रेड स्लाइसपासून बनवा गुलाब जामुन
, रविवार, 15 सप्टेंबर 2024 (07:00 IST)
साहित्य-
6-8 ब्रेडचे स्लाइस 
1/4 कप दूध
1/2 कप दूध पावडर
1/4 कप मैदा 
एक चिमूटभर बेकिंग सोडा
तळण्यासाठी तूप
 
साखरेच्या पाक-
1 कप साखर
1/2 कप पाणी
1/4 चमचा वेलची पूड 
गुलाबपाणीचे काही थेंब
 
ब्रेड स्लाइसचे गुलाब जामुन बनवण्यासाठी सर्वात आधी ब्रेड स्लाईसच्या कडा काढून घ्या आणि दुधात हलक्याश्या बुडवा. तसेच नंतर बाहेर काढून जास्तीचे दूध पिळून घ्या आणि गुळगुळीत पीठ मळून घ्या. या पिठात मिल्क पावडर, मैदा आणि बेकिंग सोडा घालून मऊ आणि लवचिक होईपर्यंत मळून घ्या. 
 
तसेच साखरेचा पाक बनवावा. एका वेगळ्या पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करा. तसेच ते उकळू द्या. त्यानंतर ते थोडे घट्ट होइसपर्यंत शिजवा. व यानंतर चवीनुसार गुलाबजल किंवा केशराचे थेंब घालावे. 
 
 गुलाब जामुनला तयार करण्यासाठी पीठाचे छोटे भाग घ्या आणि गुळगुळीत, गोलाकार गोळे करावे. 
 
तसेच एका पॅनमध्ये तूप घालून ते गरम करून घ्यावे.हे पिठाचे गोळे सोनेरी रंग येईसपर्यंत टाळून घ्या.  
 
आता तळलेले जामुन तेलातून काढून लगेच गरम साखरेच्या पाकात टाकावे. व कमीतकमी ३० मिनिट भिजू द्यावे.  तर चला तयार आहे आपले ब्रेड स्लाइस गुलाब जामुन, सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मधुमेहाच्या रुग्णांनी या 4 भाज्या कधीही खाऊ नयेत, रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढेल