कधी-कधी काही गोड धोड करावे से वाटते या साठी चविष्ट बदामाची खीर बनवू शकतो हे आरोग्य वर्धक आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य-
2 वाटी बदाम,1 चमचा साजूक तूप,3 कप दूध, 1/3 कप साखर, 1/2 चमचा वेलचीपूड.
कृती -
सर्वप्रथम, बदाम काही वेळ पाण्यात भिजवा.सुमारे दहा मिनिटा नंतर बदाम आणि दूध मिक्सरमध्ये फिरवून घ्या. एका पॅन मध्ये तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर तयार मिश्रणाला काही वेळ शिजवून घ्या. या मध्ये साखर आणि वेलची पूड घालून हलकं तपकिरी रंग येई पर्यंत शिजवा आणि गॅस बंद करा. आता हे एका बाऊलमध्ये काढून वरून सुकेमेवे घालून सर्व्ह करा.