साहित्य : 500 ग्राम दूध, 30 ग्राम साखर, 1 चथुर्तांश चमचा वेलची पावडर, 1/2 चमचा ताजी साय, बारीक साखर गरजेप्रमाणे.
कृती : कढईत दूध उकळायला ठेवावे. त्यात साय घाला. साखर घालून ढवळून घ्या. दुधाला उकळी येऊ द्या. दुधाला ढवळत राहावं. जेणे करून दूध खाली लागणार नाही.
दुधाला तो पर्यंत ढवळून उकळू द्या जो पर्यंत त्याचा मावा बनत नाही. तांबूस रंग आल्यावर आणि मावा बनल्यावर गॅस बंद करून द्या. एक चमचा साधं दूध तयार केलेल्या मावा मध्ये
थंड झाल्यावर चवीप्रमाणे बारीक साखर आणि वेलची पावडर टाका. आपल्या आवडीप्रमाणे आकाराचे पेढे बनवा. एका ताटलीत बारीक साखर भुरभुरून द्या. तयार केलेले पेढे त्या साखरेत गुंडाळून द्या. काही मिनिटातच घरच्या घरी तयार केलेले पेढे स्वतः देखील खा आणि आपल्या कुटुंबीयांना देखील खाऊ घाला.
टीप : साखरेचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे कमी-जास्त घेऊ शकता.