Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉकडाऊन आणि उन्हाळा: हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

लॉकडाऊन आणि उन्हाळा: हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर
, सोमवार, 27 एप्रिल 2020 (14:06 IST)
वर्क फ्रॉम होम असो वा घरातील इतर काम... या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पुरेश्या विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. सकाळ पासून ते रात्रीच्या झोपे पर्यंत आपलं शरीरं काम करतं असतो. शरीरास देखील थकवा जाणवतो अशा वेळेस गरज भासते एनर्जी ड्रिंक्सची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी तडजोड न करता नॅचरल एनर्जी ड्रिंक्स घेणे ‍कधीही परवडतं. आज आपण काही अशाच नॅचरल ड्रिंक्स बद्दल जाणून घेऊ या....
 
1 लिंबू पाणी - जसं की सर्वाना ठाऊकच आहे की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. व्हिटॅमिन सी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते. आणि शरीरास नवी एनर्जी देतं.
 
2 शहाळ्याचं पाणी - शहाळं किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमीला पूर्ण करून शरीरास एनर्जी शक्ती देतं. ह्या मध्ये नैसर्गिकरीत्या पोटॅशिअम पाण्याची कमी होऊ देतं नाही.
 
3 ताक - उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरतं. या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. याने पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते.
 
4  ग्रीन टी - हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच एनर्जी मिळते. आपण व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल. हे आपल्यास एनर्जी देण्याचे काम करतं.
 
5 दूध पिणे - लहानपणा पासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर असतं. दूधात अधिकाधिक पोषक तत्व असतात. त्यामुळे हा सम्पूर्ण आहार मानला गेला आहे. व्यायामानंतर दूध पिणे अधिक फायदेशीर आहे. 
 
हे सगळं नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आहे जे घेतल्याने आपल्या शरीराला काहीच नुकसान होणार नाही हे फायदेशीरच आहे. हे घेतल्याने थकवा अजिबात जाणवणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मासिक पाळी अनियमित होण्यामागील कारण, दुर्लक्ष करू नका