Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या
, रविवार, 15 जानेवारी 2023 (08:40 IST)
हिवाळ्याच्या हंगामात, मकर संक्रांतीचा सण येतो. मकर संक्रांतिला भोगीची भाजी, बाजरीची भाकर, खिचडी आणि गूळ पोळीचा बेत हमखास असतो. या व्यतिरिक्त तिळगुळाचे लाडू देखील बनवतात. चिक्की आपण अनेक प्रकारे बनवू शकतो, पण यावेळी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाची चिक्की बनवा. जाणून घ्या साहित्य आणि कृती  
 
साहित्य
1/2 कप तीळ
250 ग्रॅम - साजूक तूप
1 कप - गूळ
1/4 कप- काजू (चिरलेला)
1/2 टीस्पून- वेलची पावडर
1 कप - नारळ
1 कप - बदाम
 
कृती- 
गुळाचे तुकडे करून तीळ स्वच्छ करून घ्या. 
सोबतच सर्व ड्रायफ्रुट्स चिरून एका भांड्यात ठेवा. गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात 1 ते2चमचे साजूक तूप घालून सर्व काजू भाजून घ्या. नंतर त्याच पातेल्यात 5 चमचे तूप टाकून ते वितळवून घ्या.तुपातून धूर निघू लागल्यावर त्यात तीळ टाकून हलके परतून गॅस बंद करा. आता आपण तीळ थंड होण्यासाठी ठेवा.  
नंतर कढईत 5 चमचे तूप घालून गरम करा. आता त्यात गुळाचे छोटे तुकडे टाका 
आणि गूळ वितळवून घ्या. गुळाला ढवळत राहा.यानंतर, त्यात तीळ घालून 30 सेकंद ढवळत राहा.
नंतर त्यात काजू, वेलची पूड , नारळ घालून  सुमारे 10 मिनिटे शिजू द्या. 
गूळ आणि तीळ नीट शिजायला लागल्यावर गॅस बंद करून तूप लावलेल्या प्लेटवर पसरवा. सांचे असल्यास, ते देखील वापरले जाऊ शकते. 2 मिनिटांनी तीळ बर्फी किंवा चिक्कीच्या आकारात कापून घ्या.
आता पूर्णपणे थंड होऊ द्या आणि चाकूच्या मदतीने चिक्की बाहेर काढा. तीळ आणि गुळाची चिक्की तयार आहे.
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in Certificate course in Cyber Security After 12th: सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, शीर्ष महाविद्यालय, व्याप्ती ,पगार जाणून घ्या