Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरीच बनवा शुगर फ्री खजूर रोल

webdunia
शनिवार, 26 जून 2021 (16:52 IST)
मधुमेहाच्या रुग्णांना काही गोड खाताच येत नाही.सणासुदीच्या दिवसात त्यांच्यासाठी खास बनवा घरीच शुगर फ्री खजूर रोल.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
 
500 ग्रॅम खजूर,1 वाटी भाजून वाटलेले तीळ,2 मोठे चमचे ताजी साय,1 कप काजू,बदाम,पिस्ते बारीक केलेले आणि थोडीशी खसखस.
 
कृती-
खजुराच्या बिया काढून खजुराचे तुकडे करा.आता कढईत साय गरम करून त्यात खजुराचे तुकडे घालून हलवा.खजूर वितळल्यावर त्यात तिळाची पूड,सुकेमेवे घालून हलवून घ्या आणि गॅस बंद करा.हे मिश्रण ताटलीत काढून चांगल्या प्रकारे मिसळा आंणि या मिश्रणाचे 2-3 मोठे रोल तयार करून घ्या.
 
आता एका ताटलीत थोडीशी खसखस पसरवून द्या.नंतर या तयार रोल ला त्या खसखशीवर गुंडाळून घ्या आणि एका प्लास्टिक च्या शीट मध्ये गुंडाळून फ्रिज मध्ये  2-3 तास ठेवून द्या.नंतर बाहेर काढून सुरीने आवडीचा आकार देऊन त्याचे काप करा.खजूर रोल मिठाई खाण्यासाठी तयार आहे.मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही मिठाई फायदेशीर आहे. 
 
टीप-मधुमेहाच्या रुग्णांना साखर वर्ज्य असल्यास ते मर्यादित प्रमाणात खजुराचा वापर करू शकतात. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेहरा