Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mango Kalakand Recipe आंब्यापासून बनवा कलाकंद

Mango Kalakand
, गुरूवार, 12 जून 2025 (08:00 IST)
साहित्य-  
पिकलेला आंब्याचा गर- एक कप  
मावा - एक कप
दूध - अर्धा कप
साखर - अर्धा कप
तूप - एक टेबलस्पून
वेलची पूड - अर्धा टीस्पून
चिरलेले- काजू, बदाम, पिस्ता
ALSO READ: Sweet Recipe Mango Kheer झटपट बनवा आंब्याची खीर
कृती-
सर्वात आधी आंब्याचा मिक्सरमध्ये टाकून गुळगुळीत प्युरी बनवा. आता नॉन-स्टिक पॅनमध्ये थोडे तूप गरम करा. आता त्यामध्ये मावा घाला व परतवून घ्या. आता त्यात आंब्याची प्युरी घाला आणि चांगले मिक्स करा. आता त्यात दूध आणि साखर घाला. मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत राहून घट्ट होईपर्यंत आणि पॅनच्या बाजूने निघू लागेपर्यंत शिजवा. तसेच मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घाला आणि चांगले मिक्स करा. आता एका प्लेट किंवा ट्रेवर तूप लावा आणि ते ग्रीस करा आणि त्यात तयार केलेले मिश्रण पसरवा. वर चिरलेले काजू घाला आणि हलके दाबा  तसेच कलाकंद साधारण दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. आता ते इच्छित आकारात कापून सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Mango Halwa मँगो हलवा रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लिंबू सरबत बनवताना तुम्हीही या चुका करता का? जाणून घ्या योग्य पद्धत