Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Summer Special Recipe उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा गोडवा चाखण्यासाठी बनवा हा खास पदार्थ

Mango laddu
उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा गोडवा चाखण्यासाठी मँगो लाडू हा एक उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ आहे. हे लाडू चवीला अप्रतिम आणि दिसायला आकर्षक लागतात. आज आपण मँगो लाडूची रेसिपी राहणार आहोत. व तुम्ही घरीच रसाळ आंब्याचे लाडू नक्कीच बनवू शकता

साहित्य-
आंब्याचा गर: १ कप (हापूस किंवा केशर आंबा उत्तम)
ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं: २ कप
कंडेन्स्ड मिल्क: १/२ कप (किंवा चवीनुसार पिठीसाखर)
वेलची पूड: १/२ छोटा चमचा
तूप: १ मोठा चमचा
ड्राय फ्रूट्स काप: आवडीनुसार (काजू, बदाम, पिस्ता)

कृती-
एका कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यामध्ये २ कप सुकं खोबरं घालून मंद आचेवर १-२ मिनिटे हलके भाजून घ्या. खोबऱ्याचा रंग जास्त बदलू देऊ नका. आता भाजलेल्या खोबऱ्यात १ कप आंब्याचा गर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण सतत ढवळत राहा जेणेकरून ते कढईला लागणार नाही. मिश्रण थोडे दाट झाले की त्यात १/२ कप कंडेन्स्ड मिल्क घाला. कंडेन्स्ड मिल्क नसेल तर तुम्ही आवडीनुसार साखर आणि थोडी दुधाची साय वापरू शकता. मिश्रण कढईचे कडे सोडू लागेपर्यंत आणि त्याचा गोळा होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. यात आता वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्सचे काप घालून मिक्स करा. मिश्रण थोडे कोमट झाले की हाताला थोडे तूप लावून त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळा.
ALSO READ: Mango Rabdi Faluda Recipe घरी अगदी सहजपणे बनवता येतो मँगो रबडी फालुदा; नक्कीच ट्राय करा
खास टिप्स-
आंब्याची निवड: शक्यतो रेशा नसलेला आंबा (उदा. हापूस) वापरावा, जेणेकरून लाडू मऊ होतात.
साखर: जर आंबा खूप गोड असेल, तर कंडेन्स्ड मिल्क किंवा साखरेचे प्रमाण कमी करा.
टिकवण क्षमता: हे लाडू फ्रिजमध्ये ठेवल्यास ४-५ दिवस चांगले टिकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Mango Modak अतिशय रसाळ आणि सुगंधी मँगो मोदक बनवण्याची सोपी पद्धत; लिहून घ्या रेसिपी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mother's Day 2026 Speech in Marathi मदर्स डे भाषण मराठी