साहित्य: अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, वेलदोडा पूड, एक चमचा खोबर्याचा कीस, दोन चमचे डाळीचे पीठ, कणीक, मैदा, तूप.
कृती: कणकेच्या निम्मे मैदा व दोन चमचे डाळीचे पीठ घेऊन त्यात मोहन घाला. पोळ्यांच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. गूळ किसून घ्या. खसखस, तीळ, खोबर्याचा कीस भाजून बारीक करून घ्या. त्यात वेलदोडा पूड घाला. हे मिश्रण एकत्र करा. कणकेचा लहान गोळा घेऊन पुरी एवढे लाटा. त्यात वरील मिश्रणाचा गोळा घालून हलक्या हाताने पोळी लाटा. ही पोळी तव्यावर खमंग भाजा. या पोळ्या खूप दिवस टिकतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा