Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पौष्टिक कणकेचा हलवा

पौष्टिक कणकेचा हलवा
साहित्य – २ कप कणिक, दीड कप साजूक तूप, ६ कप पाणी, अडीच कप साखर, २ चमचे वेलची पावडर, १० ते १२ बदाम अथवा काजू (बारीक तुकडे करून घेणे), ६ ते ७ बदाम (सजावटीसाठी उभे तुकडे करून घेणे)
 
कृती – सर्वप्रथम एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र उकळवून, साखर पूर्णपणे विरघळवून घ्या. दुसऱ्या भांड्यात २ मिनिटे कणिक परता. नंतर, कणकेत तूप घालून, कणिक गोल्डन ब्राऊन हेईपर्यंत चांगली परतून घ्या. आच मंद करून परतलेल्या कणकेत हळूवारपणे साखरेचे पाणी घालता घालता सतत ढवळत रहा. सतत ढवळणे गरजेचे असून, तसे न केल्यास हलव्यात गुठळ्या तयार होतील. त्याचप्रमाणे, साखरेचे पाणी हळूवारपणे टाकत राहणे गरजेचे आहे. काही वेळात हलवा घट्ट होण्यास सुरुवात होईल. वेलची पूड आणि काजूचे बारीक तुकडे घालून हलवा एकसंध होईपर्यंत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. हलवा सर्व्ह करताना सर्व्हिंग डिशमध्ये काढून उभ्या चिरलेल्या बदामाच्या तुकड्यांनी सजवा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दाट आणि सुंदर पापण्यांसाठी हे करा...