साहित्य: अर्धा किलो मैदा, एक पाव साखर, 100 ग्रॅ. तीळ भाजून जाडसर दळलेली, 50 ग्रॅ. किसलेले ओले खोबरे, 50 ग्रॅ. चारोळी, वेलदोडा पूड, तूप.
कृती: साखर बारीक करा. त्यात तीळ, ओले खोबरे, चारोळी, वेलदोडा पूड मिळवा. मैदा गाळून घ्या. एक मोठा चमचा तेलाचे मोहन टाका. व भिजवून घ्या. लहान गोळे घेऊन पुर्या लाटून घ्या. वरील सारण भरून करंज्या तयार करा. एका कढईत तूप गरम करून तयार केलेल्या करंज्या मंद आचेवर तळून घ्या.
About Writter
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....