Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चतुर्थी स्पेशल : उकडीचे मोदक

चतुर्थी स्पेशल : उकडीचे मोदक
, सोमवार, 26 जुलै 2021 (23:53 IST)
साहित्य : एक वाटी स्वच्छ तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली पिठी, एक वाटी साखर किंवा गूळ, एक नारळ, दोन चमचे तूप, वेलची पूड, तेल, आवडत असल्यास भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड.
 
सारण: खोवलेल्या नारळाच्या चवात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधून मधून हलवावे व भांड्यायच्या तळाला चिकटू देऊ नये. शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. वेलची पूड घालून हलवून सारण सारखे करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.
 
उकड : जितकी तांदळाची पिठी, तितकेच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेवून त्यात पिठी घालून हलवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरुन खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मउसर ठेवावे.
 
मोदक : या उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देवून त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नउ अशा पाडाव्यात. काही जणी आपल्या आवडीनुसार आधी कळ्यापाडून नंतर सारण भरतात. हे तयार केलेले मोदक थोड्या पाण्याजत बुडवून एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे. आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खाण्यातस द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय विद्यापीठांमध्ये टीचिंग व नॉन टीचिंगचे हजारो पदे रिक्त