Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

घराच्या भिंती आणि आपल्यासाठी शुभ ठरणारे रंग

Color Tips to Create a Beautiful Home
, मंगळवार, 5 जानेवारी 2021 (09:16 IST)
1  उत्तरेकडील भिंत - घरातील उत्तर भाग हे पाण्याचे घटक आहे. वास्तुनुसार ह्याच्या सजावटीमध्ये फिकट हिरवा रंग किंवा पिस्ता हिरवा रंग वापरावा. आकाशी रंग देखील वापरू शकता.
2 उत्तर-पूर्वची भिंत - ह्या दिशेला ईशान्य कोण असे म्हणतात. या दिशेच्या भिंतीचा रंग आकाशी, पांढरा किंवा फिकट जांभळा असावा. या मध्ये पिवळा रंग म्हणून वापरावा कारण ते स्थान देवी-देवतांचे आहे.
3 पूर्वे कडील भिंत - या भिंतीला पांढरा किंवा फिकट निळा रंग वापरू शकता.
4 दक्षिण-पूर्वेकडील भिंत - घरातील दक्षिण-पूर्वी भाग अग्नीचे घटक आहे. या स्थानी सजावटी मध्ये केशरी, पिवळा किंवा पांढरा रंग वापरला जातो. ह्याला आग्नेय कोण असे म्हणतात. ही जागा स्वयंपाकघराची आहे.
5 दक्षिणे कडील भिंत - दक्षिण भागेत केशरी रंग वापरावा. या मुळे उत्साह आणि ऊर्जा बनून राहते. या दिशेला शयनकक्ष आहे तर गुलाबी रंग देऊ शकता.
6 दक्षिण-पश्चिम भिंत - या कडील भिंतीला नैऋत्य कोण असे म्हणतात. या भिंतीला तपकिरी, ऑफ व्हाईट किंवा हिरवा रंग द्यावा.
7 पश्चिम - या कडील भिंतीला किंवा खोलीला निळा रंग देण्याचा सल्ला दिला जातो. आपण निळ्या रंगांसह कमी प्रमाणात पांढरा रंग वापरू शकता. हे वरुण देवांचे स्थान मानले आहे, जे पाणी घटकाचे देव आहे.
8 पश्चिम-उत्तरेकडील भिंत - ह्याला वायव्य कोण देखील म्हणतात. या दिशेला बनलेल्या ड्रॉईंग रूम मध्ये फिकट राखाडी, पांढरा किंवा क्रीम रंगाचा वापर देखील करू शकता.
 
पुनश्च - 
उत्तर- हिरवा, ईशान्य-पिवळा, पूर्व -पांढरा, आग्नेय-केशरी किंवा चांदी, दक्षिण - केशरी, गुलाबी किंवा लाल, नैऋत्य -तपकिरी किंवा हिरवा, पश्चिम- निळा, वायव्य- राखाडी किंवा पांढरा.
 
आम्ही सांगू इच्छितो की या 4 रंगांनाच आपल्या आयुष्यात समाविष्ट करावे. 
1 पिवळा रंग -पिवळ्या रंगाचे कपडे पितांबर म्हणवले जाते. या अंतर्गत आपण नारंगी आणि केशरी रंग देखील समाविष्ट करू शकता. या मुळे गुरुचे बळ वाढते. गुरु हे नशीब जागृत करणारे ग्रह आहे. शास्त्रज्ञांच्या मते पिवळ्या रंगाचा वापर केल्याने लाल आणि पांढऱ्या रक्त पेशी विकसित होतात. स्वयंपाकघर आणि बैठकीच्या खोलीत या रंगाचा वापर करावा. घराची फरशी देखील पिवळ्या रंगाची ठेऊ शकता.
 
2 लाल रंग - या अंतर्गत केशरी किंवा भगवा रंगाचा देखील वापर करू शकता. हे दोन्ही रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचे आहे. या मध्ये अग्नीचे लाल रंग देखील समाविष्ट आहे. लाल रंग उत्साह, सौभाग्य,साहस आणि नवजीवनाचे प्रतीक आहे. निसर्गामध्ये लाल रंग किंवा त्याच्या रंग गटाचे फुल अधिक प्रमाणात आढळतात. देवी आई लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो. घराच्या भिंती लाल नसाव्यात. शयन कक्षामध्ये चादरी, पडदे आणि मॅट्स लाल रंगाच्या नसाव्यात.
 
3 पांढरा रंग - पांढरा रंग हा आत्म्याचा रंग आहे या मध्ये किंचित निळेपणा देखील आहे. पांढरा रंग आई सरस्वतीचा आहे. या मुळे राहू शांत असतो. घरात पांढरा रंग देण्याचे काही वास्तू नियम समजून घ्यावे. पांढऱ्या रंगाने मनात शांती आणि आनंदाची अनुभूती होते. या रंगामुळे शुद्धता आणि पावित्र्याची देखील अनुभूती होते.
 
4 निळा रंग - या जगात निळ्या रंग जास्त आहे. आपण गुलाबी रंगाला बघावे तर या मध्ये लाल, पांढरा आणि निळा रंग दिसतो. हा रंग देखील विचार करून वापरावा. शुद्ध निळा रंग वापरू नये. निळ्या रंगाच्या सह पिवळा, पांढरा आणि फिकट लाल रंगांचा वापर देखील करू शकता. निळ्या रंगाचा योग्य वेळी आणि योग्य वापर केल्यास हे आयुष्यात यश देईल. जांभळा किंवा निळसर रंगाचा वापर करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रंग पालटेल आपलं नशीब