Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दक्षिणमुखी घराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे 7 उपाय करा

दक्षिणमुखी घराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे 7 उपाय करा
, गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (12:11 IST)
वास्तु शास्त्रात दक्षिण दिशेला घर काही विशिष्ट परिस्थितीला वगळता अशुभ आणि नकारात्मक प्रभावाचे मानले जाते. या शिवाय दक्षिणमुखी घरातील दोषांना काही उपाय करून दूर केले जाऊ शकते. त्या परिस्थिती कोणत्या आहे आणि दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत, चला थोडक्यात जाणून घेऊ या.
 
दक्षिणेकडील घर असल्याने काय होते ?
पूर्वेला सूर्य, आग्नेयात शुक्र, दक्षिणेला मंगळ, नैऋत्यात केतू, पश्चिमेत शनी, वायव्यात चंद्र, उत्तरेत बुध, ईशान्येत बृहस्पतीचा प्रभाव आहे. वास्तुशास्त्रात दक्षिण दिशेचे दार अशुभ मानले आहे. ह्याला संकटाचे दार असे ही म्हणतात. जर आपले देखील घर दक्षिणमुखी असून दूषित आहे तर घरातील मालकाला त्रास होतो भावण्डात कटुता, राग अधिक येणं आणि अपघात वाढतात. रक्तदाब, रक्तविकार, कुष्ठरोग, उकळणे, मूळव्याध, कांजिण्या, प्लेग इत्यादी आजार होण्याची शक्यता आहे. या दिशेने घर असल्याने अकाळी मृत्यूचे योग्य बनतात.
 
दक्षिणिमुखी घरात दक्षिण दोष कसे नाही ?
1 दक्षिणिमुखी घराच्या समोर दारापासून दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे हिरवेगार झाड असेल किंवा त्या घरापेक्षा दुपटीने मोठे घर आहे तर दक्षिण दिशेचा प्रभाव काही प्रमाणात नाहीसा होतो.
 
2 या शिवाय दारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे.
 
3 दक्षिणिमुखी असलेल्या भूखंडामध्ये मुख्य दार आग्नेय कोनात बनलेले आहे आणि उत्तरेकडे आणि पूर्वीकडे जास्त आणि पश्चिमीकडे कमीतकमी मोकळी जागा सोडलेली असेल तरी दक्षिण दिशेचे दोष कमी होतो.
 
4 बागेत लहान रोपटे पूर्व-ईशान्य दिशेला लावल्याने दक्षिण दोष कमी होतो.
 
5 आग्नेय कोनातील मुख्य दार लाल किंवा तांबड्या रंगाचे आहे तर हे चांगले फळ  देतो या शिवाय हिरवे, किंवा तपकिरी रंगाची निवड देखील केली जाऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत मुख्य दाराला निळा किंवा काळा रंग देऊ नये.
 
6 दक्षिणिमुखी भूखंडाचे दार दक्षिणेला किंवा दक्षिण-पूर्वी कडे बनवू नये. पश्चिम किंवा इतर कोणत्या दिशेला दार करणे लाभदायी आहे.
 
7 जर आपले दार दक्षिणेला आहे तर दाराच्या अगदी समोर आरसा अशा प्रकारे लावा की ज्यामध्ये माणसाचे संपूर्ण प्रतिबिंब दिसेल. या मुळे घरात प्रवेश करणाऱ्या माणसांसह येणारी नकारात्मक ऊर्जा परतते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्ष 2021 मध्ये हे मंत्र जपा, ग्रहांचे दोष दूर करा