Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

वास्तुशास्त्रानुसार दुकानाची दिशा कशी असावी..

direction of shop
, सोमवार, 1 एप्रिल 2019 (16:50 IST)
दुकान अथवा व्यवसायावर व्यक्ती व त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असतो. व्यक्तीच्या व्यापार व्यवसायात चांगली वृद्धी होत असेल तर तो व त्याला परिवार सुखी असतो. वास्तुशास्त्रात दुकानासंदर्भात विशेष सांगण्यात आले आहेत. दुकान व दुकानाची दिशा यांच्याबाबत विशेष नियम त्यात सांगितले आहेत. ती नियम पुढील प्रमाणे-
 
1. पूर्व दिशेला प्रवेशद्वार असलेले दुकान शुभ मानले जाते.
2. उत्तर दिशेला प्रवेशद्वार असलेले दुकानात मालकाच्या इच्छेनुसार व्यवसायात वृद्धी होते. 
3. नैरृत्य अथवा वायव्य दिशेला प्रवेशद्वार असलेल्या दुकानात 10 ते 15 वर्षातच भरभराटी येते. मात्र त्यानंतर त्याला उतरती कडा येते.
4. दक्षिण दिशेला असलेले दुकान जर सोने-चांदी, सौंदर्य प्रसाधने व महिलांच्या उपयोगी वस्तूंचे असेल तर त्याच्या मालकासाठी लाभदायी असते. तसेच काळ्या रंगाच्या वस्तूंची ही विक्री देखील चांगली होते व व्यापारात वृद्धी होते.
5. पूर्व दिशेला प्रवेशद्वार असलेले दुकानात कपडे, पुस्तके, स्टेशनरी, सुशोभीकरणाच्या वस्तू व वाहन विक्री होत असेल तर त्या दुकानात देखील लक्ष्मीचा वास असतो. 
6. पश्चिममुखी असलेल्या दुकानात शेती उपयोगी साहित्य, बी-बियाणे, कीटकनाशके आदी वस्तूच्या विक्री केल्या जात असतील तर त्याच्या व्यवसायात चांगल्या प्रकारे फायदा होतो.
7. दुकानाच्या मालकाने उत्तर दिशेला तोंड करून बसले पाहिजे.
8. दुकानातील माल ठेवायचे कपाट हे दक्षिण दिशेला ठेवले पाहिजे.
9. पाण्याचा माठ किंवा वाटर कूलर हे ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवले पाहिजे.
10. दुकानाला पायऱ्या व ओटा हा असायलाच पाहिजे.
11. दुकानातील पैशांचा गल्ला हा दक्षिण दिशेच्या भिंतीला पाहिजे व हिशोबाचा टेबल हा आयता कृती आकाराचा पाहिजे.
12. दुकानातील जुनाट झालेला माल त्वरित विकला पाहिजे.
13. दुकानातील सामान ठेवण्यासाठी तयार केलेले कपाट हे शक्यतो लागडाचे पाहिजे.
14. दुकानातील देव घर हे उत्तर-पूर्व दिशेला ठेवले गेले पाहिजे व तेथे दररोज दिवा व उदबत्ती लावली पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरात कासव ठेवण्याची योग्य दिशा जाणून घ्या