Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ, जाणनू घ्या 5 फायदे

, शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (10:14 IST)
वास्तू, ज्योतिष आणि लाल किताब मध्ये देखील हत्तीला शुभ मानले गेले आहे. शास्त्रात या प्राण्याचा संबंध विघ्नहर्ता गणपती आणि धनाची देवी लक्ष्मीशी आहे. तर चला जाणून घ्या घरात हत्तीचा पुतळा किंवा मूर्ती ठेवण्याचे काय फायदे आहे-
 
1 शयनकक्षात पितळ्याचे हत्ती ठेवणे किंवा हत्तीचे मोठे चित्र लावल्याने नवरा बायकोतील मतभेद संपतात.
 
2 पितळ्याचे हत्ती बैठकीच्या खोलीत ठेवल्याने हे शांतता आणि सौख्य कारक आहे. याच बरोबर हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देतं.
 
3 लाल किताबानुसार घरात किंवा खिशात चांदीचा हत्ती ठेवावा. हे कुंडलीत पाचवा आणि बाराव्या घरात बसलेल्या राहूसाठी उपाय आहे. यामुळे मुलांना त्रास होत नाही आणि व्यवसायात देखील फायदा होतो.
 
4 चांदीचा हत्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवणं वास्तूच्या दृष्टीने शुभ मानले गेले आहे. हे समृद्धीचे प्रतीक आहे.
 
5 फेंगशुईमते हत्तीचा पुतळा किंवा चित्र घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेसह धनप्राप्तीचे स्तोत्र सापडतात. ज्या हत्तीच्या चित्रात किंवा पुतळ्यात त्याची खोड वाकलेली असल्यास त्याला लिव्हिंग रूम मध्ये लावावं. असे केल्यास घरात सौख्य आणि शांतता वाढते. हत्तींची खोड वरील बाजूस असल्यास बढती होते आणि धन आणि मालमत्ता वाढतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या 5 वस्तू योग्य दिशेला ठेवल्याने घरातील सर्व समस्या सुटतील