Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केळीचे झाड घरात असल्यास मिळणार 5 चमत्कारिक फायदे

केळीचे झाड घरात असल्यास मिळणार 5 चमत्कारिक फायदे
, मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (11:32 IST)
केळीचे झाड फार पवित्र मानले गेले आहे आणि बऱ्याच धार्मिक कार्यात त्याचा वापर केला जातो. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला केळ्याचा नैवेद्य दिला जातो. केळीच्या पानात प्रसाद वाटप केला जातो. चला जाणून घेऊया केळीच्या पूजेचे 5 चमत्कारिक फायदे.
 
वैज्ञानिक परिचय : केळ्यात प्रामुख्याने व्हिटॅमिन- ए, व्हिटॅमिन- सी, थायमिन, रायबोफ्लॅविन, नियासिन आणि इतर खनिज घटके असतात. यामध्ये पाण्याचे प्रमाण 64.3 टक्के, प्रथिनं 1.3 टक्के, कार्बोहायड्रेट 24.7 टक्के आणि स्निग्धता 8.3 टक्के आहे.
 
आयुर्वेदिक फायदे : केळं प्रत्येक हंगामात सहजरीत्या उपलब्ध होणारे पौष्टिक आणि चविष्ट फळ आहे. केळ चवदार, गोड, शक्तिवर्धक, वीर्य आणि मांस वाढविणारे, नेत्रदोषात फायदेशीर आहेत. पिकलेल्या केळ्याच्या नियमाने सेवन केल्याने शरीर बळकट होतं. हे कफ, रक्तपित्त, वात आणि श्वेत प्रदर सारख्या रोगाला नष्ट करतं. 
 
वास्तू टिप्स : 
घराच्या मुख्य दारावर आणि मागील भागास केळीचे झाड लावू नये. 
केळीच्या झाडा जवळ स्वच्छता राखावी. 
केळीच्या तांड्यात लाल दोरा बांधून ठेवा.
 
धार्मिक आणि ज्योतिषीय लाभ :
असे म्हणतात की केळीच्या झाडात भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचे वास्तव्य असते. 
 
केळीच्या झाडाचे 5 धार्मिक आणि ज्योतिषीय फायदे.
1 घरातील मुले नेहमी आनंदी आणि सर्व संकटापासून दूर राहतात.
2 अशी आख्यायिका आहे की केळीच्या झाडाची पूजा केल्याने समृद्धी येते. 
3 घरात केळीचे झाड लावल्याने बृहस्पती ग्रहाचे शुभ परिणाम मिळतात.
4 हे घरात असल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. विवाहायोग्य मुलं-मुलींचे लग्न लवकर होतात.
5 उच्च शिक्षण आणि ज्ञान प्राप्तीसाठी हे झाड उपयुक्त असल्याचे सिद्ध होते, कारण त्यामधून नेहमीच शांत आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सप्टेंबर 2020 महिन्यातील राशी भविष्य