Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लसूण औषधी असलं तरी कुणी खाणे टाळावे

लसूण औषधी असलं तरी कुणी खाणे टाळावे
, शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (12:27 IST)
खाद्य पदार्थात लसूण घातल्यावर पदार्थाची चवच वेगळी लागू लागते. पचन तंत्रासाठी तसेच हृद्याच्या आरोग्यासाठी लसणाचा वापर श्रेष्ठ मानला गेला आहे. 
 
लसणाचे मूळ तिखट आहे. लसणात सहा रस सामविष्ट आहेत. लसणीचे मूळ तिखट, पाने कडू, देठ खारट, नाळ तुरट तर बी गोड चवीची आहे. यात केवळ आंबट रस नाही.
 
लसूण सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत जसे- 
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास बसलेला आवाज सुधारतो. तसेच तुपात तळलेल्या लसणाच्या सेवनाने अपचनाची समस्या दूर होते.
लसणाच्या पाकळ्या खाऊन पाणी प्यायल्याने उचकी थांबते.
दम्याच्या रुग्णांसाठी लसण फायदेशीर ठरतं.
तान्ह्या बाळाला लसूण खाऊ घालणे शक्य नाही म्हणून सदी-पडसं झाल्यास त्यांच्या गळ्यात लसणाची माळ घालतात.
स्त्रियांनी लसणाचे सेवन केल्यास गर्भाशयाचे विकार होत नाही.
शरीर वेदनांवर लसणाचे तेल देखील फायदेशीर ठरतं.
 
लसणाचे इतके फायदे असले तरी काही लोकांच्या प्रकृतीसाठी लसणाचे सेवन करणे धोक्याचे ठरु शकतं म्हणून या लोकांनी लसूण खाणे टाळावे-
पित्ताचा त्रास असणार्‍यांनी, गरोदर स्त्रियांनी आणि नाक आणि तोंडातून रक्त येत असणार्‍यांनी लसूण खाऊ नये. तसेच ज्यांना प्रकृती गरम पदार्थ सहन होत 
 
नाही त्यांनी देखील विचारपूर्वकच लसणाचे सेवन करावे. कारण लसूण उष्ण आणि तीक्ष्ण असतं. लसणाचं गुण उग्र असल्याने काही लोकांनी लसूण खाणे टाळावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाल भोपळ्याचे घारगे, अतिशय चविष्ठ रेसिपी