Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

गोराचनचा‍ टिळा लावा, श्रीमंत व्हा

gorochan benefits
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (09:04 IST)
गोराचन सिद्ध वस्तू आहे ज्याचा वापर अनेक कार्यांसाठी केला जातो. धन-संपत्ती, सुख-समृद्धी, श्रीमंतीसाठी याचा वापर केला जातो. याचे तिलक केल्याने आकर्षण प्राप्ती होते.
 
गोराचन पिवळ्या रंगाचं एक सुवासिक पदार्थ असतं ज्यात हलकी लालिमा असते. हे मेणासारखं असतं आणि वाळल्यावर घट्ट होतं. याला गो पित्त देखील म्हणतात कारण हे गायीच्या पित्ताने तयार होणारं एक दगडं असतं ज्याल गायीच्या मृत्यूनंतर काढलं जातं. हे मिळविण्यासाठी गायीचं वध करणे वर्ज्य आहे.

कसं वापरावं गोराचन
याला बाजारातून आणल्यावर सिद्ध करावं लागतं. याला रवि पुष्य नक्षत्रात सिद्ध केलं जातं. या काळात स्नान करुन पूजा स्थानी बसून सोन्या किंवा चांदीच्या पात्रात गोराचन ठेवून याची पंचोपचार पूजा करावी. नंतर दोन मंत्रांनी एक-एक माळ जपावी-
ऊं शांति शांत: सर्वारिष्टनाशिनि स्वाहा: 
ऊं श्रीं श्रीयै नम:
मंत्र जाप झाल्यावर त्या डबीत याला सुरक्षित ठेवावे.
 
वास्तु दोष दूर करण्यासाठी पूजा स्थानी चांदीच्या डबीत गोराचन ठेवून त्याची पूजा करावी. घरात सकारात्मक वातावरण निर्मित होतं.
गोराचनचा टिळा लावल्याने श्रीमंती येते.
गोराचनचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी.
घरात कोणी आजारी असल्यास रविवार किंवा मंगळवारी एक लहान चमचा गुलाब पाण्यात गोराचन मिसून त्या व्यक्तीला पाजल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.
केळ्यात गोराचन मिसळून तयार लेप मस्तकावर लावल्याने आकर्षण शक्ती वाढते.
 
नोट- हा लेख केवळ शास्त्राप्रमाणे दिलेल्या माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी ज्योतिषी सल्ला घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवग्रहांना प्रसन्न करण्यासाठी शंख वापरा